Chipi Airport: सिंधुदूर्गमध्ये राजकारण तापले; चिपी विमानतळ 'या' तारखेपासून सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 09:38 PM2021-02-09T21:38:50+5:302021-02-09T21:39:54+5:30

Chipi Airport news: चिपी विमानतळाच्या कामाची सुरुवात राणेंनी केली होती. मात्र, त्यांच्या काळात विमानतळाचे केवळ 14 टक्के कामच झाले होते असा दावा राऊत यांनी केला आहे.

Chipi Airport will start from 1 march : Vinayak Raut | Chipi Airport: सिंधुदूर्गमध्ये राजकारण तापले; चिपी विमानतळ 'या' तारखेपासून सुरु होणार

Chipi Airport: सिंधुदूर्गमध्ये राजकारण तापले; चिपी विमानतळ 'या' तारखेपासून सुरु होणार

सध्या राजकीयदृष्ट्या तापलेल्या सिंधुदूर्गमधून एक मोठी बातमी येत आहे. श्रेयवादावरून चर्चेत असलेला चिपी विमानतळ लवकरच सुरु होत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या येण्यामुळे खासदार नारायण राणे कमालीचे आक्रमक झाले आहेत. केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चा जोर धरू लागल्याने शिवसेनेचे नेते देखील वार करू लागले आहेत. यातच आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळावरून 1 मार्चपासून वाहतूक सुरु होईल अशी घोषणा केली आहे. (Chipi airport Will Start from 1st March.)


चिपी विमानतळाच्या कामाची सुरुवात राणेंनी केली होती. मात्र, त्यांच्या काळात विमानतळाचे केवळ 14 टक्के कामच झाले होते असा दावा राऊत यांनी केला आहे. याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून विमानतळ सुरु करण्याबाबत अनेक दावे, प्रतिदावे केले जात होते. उद्घाटनाला नारायण राणेंना बोलविणार की नाही इथपासून ते दिल्लीतून उडणाऱ्या पहिल्या विमानात मी असेन, पण राणे असतील की नाही माहिती नाही, इथपर्यंत आरोप प्रत्यारोप होत होते. आता पुन्हा चिपी विमानतळ जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. 


राऊत यांनी 1 मार्चपासून विमानतळावरील वाहतूक सुरु होणार असल्याचे सांगितले असले तरीही उद्घाटन कधी आणि कसे होणार यावर काहीही सांगितलेले नाही. चिपी विमानतळावर कालपासून ट्रायल लँडींग सुरु झाली आहे. त्यामुळे आता लवकरच नियमित सेवा सुरु होईल. येत्या काही दिवसातच डीजीसीएची टीम येईल. त्यानंतर 1 मार्चपासून नियमितपणे सिंधुदुर्ग ते मुंबई आणि अहमदाबाद ते सिंधुदुर्ग अशी विमान वाहतूक सुरु होईल, असे विनायक राऊत म्हणाले. भाजप खासदार नारायण राणेंच्या कारकिर्दीत चिपी विमानतळाचे काम केवळ 14 टक्के झालं होतं. मात्र आम्ही ते काम शंभर टक्के पूर्ण केले. त्यामुळे आता विमान वाहतूक सुरु करणार आहोत, असेही ते म्हणाले. 


उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Chipi Airport will start from 1 march : Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.