Navratri 2020 : मी- दुर्गा :  शमिका आंगणे, कोरोनाच्या महामारीतही शिक्षणाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 06:33 PM2020-10-24T18:33:54+5:302020-10-24T18:37:51+5:30

Navratri, sindhudurg, Teacher, Education Sector आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचे प्रयत्न आपण सर्वच जण सातत्याने करीत असतो. मात्र, यातील काही प्रयत्नांना यश येते. तसे यश मिळवायचे असेल तर मग प्रचंड मेहनत, इच्छाशक्ती, परिश्रम घेताना वाटेत आलेल्या संकटांना पायदळी तुडवित सतत कार्यरत रहावे लागते. मालवण तालुक्यातील आंगणेवाडी गावच्या सूनबाई आणि वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे डिगवेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका शमिका चंद्रशेखर आंगणे यांनी आई-वडिलांची इच्छा पूर्ण करताना शिक्षणाचे पवित्र कार्य अविरत जोपासले आहे.

The fat of education even in the epidemic of corona | Navratri 2020 : मी- दुर्गा :  शमिका आंगणे, कोरोनाच्या महामारीतही शिक्षणाचा वसा

Navratri 2020 : मी- दुर्गा :  शमिका आंगणे, कोरोनाच्या महामारीतही शिक्षणाचा वसा

googlenewsNext
ठळक मुद्देNavratri 2020 : मी- दुर्गा :  शमिका आंगणे

ई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचे प्रयत्न आपण सर्वच जण सातत्याने करीत असतो. मात्र, यातील काही प्रयत्नांना यश येते. तसे यश मिळवायचे असेल तर मग प्रचंड मेहनत, इच्छाशक्ती, परिश्रम घेताना वाटेत आलेल्या संकटांना पायदळी तुडवित सतत कार्यरत रहावे लागते. मालवण तालुक्यातील आंगणेवाडी गावच्या सूनबाई आणि वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे डिगवेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका शमिका चंद्रशेखर आंगणे यांनी आई-वडिलांची इच्छा पूर्ण करताना शिक्षणाचे पवित्र कार्य अविरत जोपासले आहे.

शमिका या मसुरे गावच्या सुकन्या व पूर्वाश्रमीच्या सोनाली सदानंद कोरगावकर. त्यांच्या आई-वडिलांचा हॉटेल व्यवसाय. त्यांना दोन बहिणी व तीन भाऊ. आपले एकतरी मूल शासकीय नोकरीत असावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी शमिका यांनी सातत्याने प्रयत्न केला. प्राथमिक शिक्षण मसुरेतील बागवे हायस्कूलला. त्यानंतर ज्युनिअर कॉलेज कुडाळला तर डी. एड्. मालवणला पूर्ण केले. त्यानंतर मालवण तालुक्यातील बिळवस आणि माळगाव हायस्कूलला रजा कालावधीत तर कुडाळकर हायस्कूल मालवणच्या मराठी शाळेत शिक्षिका म्हणून काही काळ काम केले.

नोव्हेंबर २००७ मध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका म्हणून निवड झाल्यानंतर शमिका यांनी ख�या अर्थाने शासकीय नोकरीत पदार्पण केले. त्यांना पहिली शाळा बिळवस नं. १ मिळाली. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांची बदली वेतोरे डिगवेवाडी शाळेत झाली. शमिका यांनी शिक्षणाचे अविरत कार्य करतानाच गेल्या चार वर्षांत शाळाबाह्य अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन वाहवा मिळविली आहे. परसबाग स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वच्छता अभियान उपक्रम,प्लास्टिक मुक्ती अभियान याचबरोबरीने सांस्कृतिक कार्यक्रमात चमकदार कामगिरी केली. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांची निवड वेंगुर्ला तालुका पातळीवर आणि त्यानंतर जिल्हा पातळीवर झाली होती. गेल्या सहा महिन्यांत कोरोनाच्या कालावधीत त्या राहत असलेल्या कुडाळ ते वेतोरे शाळा असा दररोज प्रवास करून क्वारंटाईन लोकांसाठीही त्यांनी सेवा दिली आहे. त्यामुळे शमिका या खऱ्या सेवाव्रती बनल्या आहेत.


कोरोनाच्या महामारीतही माझ्यावर शासनाने टाकलेली जबाबदारी मी यशस्वीरित्या पूर्ण करू शकले. यासाठी मला माझ्या कुटुंबातील सर्वांनीच मदत केली आहे. त्यांच्यामुळेच मी दररोज घरातून बाहेर पडून प्रवास करू शकले. आई, वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत कामी आली. समाजाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मी अशीच कार्यरत राहणार आहे.
-  शमिका आंगणे,
मुख्याध्यापिका
(७५८८१४६५७५) 

Web Title: The fat of education even in the epidemic of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.