अंबरनाथच्या डम्पिंगचा धूर पालिका प्रशासनालाही झोंबतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:27 PM2018-12-09T23:27:31+5:302018-12-09T23:28:04+5:30

अंबरनाथ नगरपरिषदेचे अनधिकृत डम्पिंग ग्राउंडचा विषय चर्चेत आला आहे. या डम्पिंगला सातत्याने आग लागत असल्याने धुराचा त्रास नागरिकांना होत आहे.

Ambernath's dumping department is also vigilant | अंबरनाथच्या डम्पिंगचा धूर पालिका प्रशासनालाही झोंबतोय

अंबरनाथच्या डम्पिंगचा धूर पालिका प्रशासनालाही झोंबतोय

googlenewsNext

- पंकज पाटील, अंबरनाथ

अंबरनाथ नगरपरिषदेचे अनधिकृत डम्पिंग ग्राउंडचा विषय चर्चेत आला आहे. या डम्पिंगला सातत्याने आग लागत असल्याने धुराचा त्रास नागरिकांना होत आहे. या विरोधात नागरिक एकत्रित आले असून त्यांनी राजकीय पक्षांना बाजूला सारुन स्वतंत्र लढा सुरु केला आहे. डम्पिंगमुळे पालिका प्रशासनावरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. मुदलात अंबरनाथ डम्पिंगचा धूर नागरिकांसोबत पालिका प्रशासनालाही झोंबत आहे.

अंबरनाथ फॉरेस्ट नाका परिसरातील हे डंपिंग ग्राऊंड गेल्या २० वर्षांपासून सुरु आहे. डंपिंगच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती झाली. उंच उंच इमारती या ठिकाणी उभ्या राहिल्या. या ठिकाणी राहणारे नागरिक अनेक वर्षांपासून दुर्गंधीमुळे त्रस्त होते. आता गेल्या वर्षभरापासून डंपिंग पेटत असल्याने धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार करुनही पालिका प्रशासन त्यावर तोडगा काढत नाही. त्यामुळे त्रस्त रहिवाशांनी एकत्रित लढा देण्यास सुरुवात केली आहे. डंपिंग ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या नवरे नगर, हरीओम पार्क, ग्रीन सीटी, निसर्ग ग्रीन तसेच परिसरातील सोसायटींच्या रहिवाशांनी संघर्ष समिती तयार केली आहे. या समितीच्या पुढाकाराने अनेक आंदोलने करण्यात आली. नागरिकांनी डंपिंग ग्राऊंडवर निदर्शने केली. संघर्ष वाढल्यावर पालिकेलाही जाग आली. त्यात भर पडली ती राष्ट्रीय हरीत लवादाने घनकचरा व्यवस्थापनेसाठी तयार केलेल्या समितीची. या समितीचे प्रमुख जे. पी. देवधर यांनी डंपिंग विरोधात आलेल्या बातम्यांची दखल घेऊन डंपिंगला भेट दिली. यावेळी पालिकेचे अधिकारी हजर होते. डंपिंगची परिस्थिती पाहिल्यावर देवधर संतप्त झाले. त्यांनी लागलीच डंपिंग ग्राऊंडसंदर्भात उपाययोजना सुरु करण्याचे आदेश दिले. डंपिंग प्रकरण अधिकाऱ्यांंच्या अंगलट येणार हे लक्षात येताच प्रशासन खडबडून जागे झाले. अधिकाºयांच्या ताफ्याने डंपिंगवर काम सुरु केले. आगीच्या धुराचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने कचºयावर मातीचा भराव सुरु केला. या भरावामुळे आगीचे प्रमाण कमी होणार आहे. त्यासोबत डंपिंगच्या कचºयाच्या ठिकाणी पाइप टाकून कचºयातून निर्माण होणारे गॅस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. एकीकडे आगीवर नियंत्रण मिळवत धुराचा त्रास कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत तर दुसरीकडे डंपिंग ग्राउंडवर कमीत कमी कचरा कसा जाईल याची उपाययोजना सुुरू केली आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती केली जात आहे. त्यासाठी अधिकारी आणि मुकादमांना कामाला लावले आहे. ज्या भागात गाडी जात नाही त्या भागात महिला बचत गटामार्फत काम सुरु केले आहे.
स्वच्छता आणि डंपिंगबाबत पालिका प्रशासनाने केलेले काम योग्य असले तरी त्याचे परिणाम अजूनही दिसत नाहीत. आगीचे प्रकार घडतच असल्याने धुराचा त्रास कायम आहे. त्यामुळे लवकर उपाययोजना पूर्ण करण्याची गरज आहे. कचºयावर प्रक्रिया करणारी स्वतंत्र यंत्रणा राबवण्याची गरज आहे. ही यंत्रणा कार्यान्वित होत नाही तोपर्यंत धुराचा त्रास सहन करावा लागणार आहे. अंबरनाथमध्ये कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्पाचाच आधार घेतला जात आहे. मात्र कचºयाचे वाढते प्रमाण पाहता मोठी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा कमी पडत आहे.

कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने जो आराखडा तयार केला आहे त्यानुसार लवकर काम सुरु होणे गरजेचे आहे. मात्र तो प्रकल्प ज्या जागेवर उभा राहणार आहे त्या ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध पालिकेला सहन करावा लागणार आहे. या आधी वडवली भागातील नागरिकांनी कचºयावर प्रक्रिया करण्यास विरोध केला होता. विरोधाची मालिका कायम राहिल्यास पालिकेच्या डंपिंगचा त्रास हा नागरिकांना कायमचा सहन करावा लागणार आहे.

Web Title: Ambernath's dumping department is also vigilant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.