मेंदुज्वर आजाराने ग्रस्त मुलीस १ लाख ६० रूपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 07:32 PM2017-09-04T19:32:13+5:302017-09-04T19:33:13+5:30
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील कोहाळा बाजार येथील प्रियंका शंकर गरूडे ही मुलगी मेंदुज्वर आजाराने त्रस्त असून तिच्या उपचाकरिता १ लाख ६० हजार रूपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमधून मंजूर करण्यात आली आहे. प्रियंकावर औरंगाबाद येथे उपचार सुरू असून, डॉक्टरानी पाच लाख रूपये खर्च संगीतलेला आहे. तिच्या पालकांची आर्थिक स्थिति हलाखीची असल्याने उपचारासाठी विलंब होत आहे. सर्वच स्तरातून तिच्यासाठी मदतिचा ओघ वाहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सामाजिक भान जोपासत माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या चिमुकलीच्या उपचारासाठी 5 हजार रूपये दिले होते. तसेच तिच्या पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधिमधून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री यांचे आरोग्य विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सोनपुरे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव तात्काळ आर्थिक मदत मिळवन्यासाठी पाठविला होता. गेल्या आठ दिवसांपासून विजयराज शिंदे यांनी सतत पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहायता निधि अंतर्गत १ लाख ६० हजार रूपयांचा निधी मुलीच्या उपचारासाठी मंजूर केला आहे. विजयराज शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने या भरिव मदतिमुळे आता या चिमुकलिवर पुढील उपचार होऊन तिला जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे