भिकाऱ्याच्या थैलीत १ लाख ६३ हजार! पोलिसांनी कुटुंबीयांना शोधून सोपविली रक्कम आणि पासबुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 10:05 AM2023-11-11T10:05:26+5:302023-11-11T10:08:46+5:30

धनत्रयोदशीच्या दिवशी पोलिसांनी कर्तव्यापलीकडे जात या मृत भिकाऱ्याच्या कुटुंबीयांना शोधून ही रक्कम व पासबुक कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

1 lakh 63 thousand in a beggar's bag! The police traced the money and handed over the passbook to the family | भिकाऱ्याच्या थैलीत १ लाख ६३ हजार! पोलिसांनी कुटुंबीयांना शोधून सोपविली रक्कम आणि पासबुक

भिकाऱ्याच्या थैलीत १ लाख ६३ हजार! पोलिसांनी कुटुंबीयांना शोधून सोपविली रक्कम आणि पासबुक

- दत्ता उमाळे

मेहकर (जि. बुलढाणा) : अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या मेहकर येथील एका भिकाऱ्याच्या थैलीत तब्बल १ लाख ६३ हजार रुपयांची रक्कम सापडली आहे. सोबतच बँक खात्यातही रक्कम जमा असल्याचे समाेर आले. धनत्रयोदशीच्या दिवशी पोलिसांनी कर्तव्यापलीकडे जात या मृत भिकाऱ्याच्या कुटुंबीयांना शोधून ही रक्कम व पासबुक कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

एकीकडे कुटुंबाचा कणा मोडून पडल्याने झालेले दु:ख तर दुसरीकडे उपजीविकेसाठी त्यानेच मिळविलेले आर्थिक पाठबळ बघताच मृत भिकाऱ्याच्या कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते. मात्र, हा अत्यंत संवेदनशील क्षणही पोलिसांनी तितक्याच कौशल्याने हाताळला. संबंधित मृत व्यक्ती भीक मागायचा. ८ नोव्हेंबरला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला.

गंभीर अवस्थेत त्यांना प्रथम बुलढाणा व तेथून अकोला येथे हलविण्यात आले; ९ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघात झाला तेथून एक सायकल, मृत व्यक्तीची थैली ताब्यात घेतली. त्यामध्ये १ लाख ६३ हजार रुपये आढळले. त्यातच आधारकार्डही दिसले. अंजनी खुर्द या गावी मृतावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: 1 lakh 63 thousand in a beggar's bag! The police traced the money and handed over the passbook to the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.