जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:34 AM2021-05-13T04:34:57+5:302021-05-13T04:34:57+5:30

--दोन दिवसांपासून दुसरा डोस नाही-- गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दुसरा डोस घेण्याची वेळ झालेल्या एकासही डोस देण्यात आलेला नाही. ...

1 lakh citizens in the district waiting for the second dose | जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

googlenewsNext

--दोन दिवसांपासून दुसरा डोस नाही--

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दुसरा डोस घेण्याची वेळ झालेल्या एकासही डोस देण्यात आलेला नाही. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या डोसचे व्यस्त प्रमाण स्पष्ट होते.

--३१ हजार नागरिकांना दुसऱ्या डोसची नितांत गरज--

जिल्ह्यात दुसऱ्या डोसचा एक लाख व्यक्तींचा ड्यू जवळ आलेला आहे. त्यापैकी ३१ हजार ६७१ जणांना त्वरित हा दुसरा डोस देणे गरजेचे झाले आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने आता हालचाली सुरू केल्या असून अशांना दुसरा डोस देण्यासाठीची पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात कोविशिल्डचा दुसरा डोस त्वरित मिळणे गरजेचे असलेल्यांची संख्या ही ३१ हजार ६७१ असून कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस गरजेचा असलेल्यांची संख्या ११ हजारांच्या घरात आहे. त्याचा मेळ आरोग्य विभाग सध्या लावत आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्याला कोविशिल्डचे ८,७०० डोस उपलब्ध झालेले आहेत.

--आजपर्यंत पहिला डोस घेतलेले--

तालुका पहिला डोस घेतलेले पात्र लोकसंख्या

बुलडाणा ३३,९४४ १,०६,०७२

चिखली २४,४६६ १,०१,१०७

दे. राजा १४,६०३ ४६,४६३

ज. जामोद १८,०६४ ५५,८२१

खामगाव १९,७८० १,१७,८७२

लोणार १६,९४४ ५७,३७१

मलकापूर १५,५४३ ६२,८२२

मेहकर ३३,९६८ ९८,३३२

मोताळा ११,२२१ ५७,३३०

नांदुरा १४,५४२ ६३,२५८

संग्रामपूर १४,८०६ ४७,२९५

शेगाव १९,३६५ ५२,५६१

सि. राजा १५,१२० ६३,८३६

एकूण २,५२,३६३ ९,३०,१००

(यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींचा समावेश आहे.)

--आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सचे झालेले लसीकरण--

प्रकार उद्दिष्ट साध्य टक्केवारी

आरोग्य कर्मचारी १८,८७५ १५,३६५ ९१.५

फ्रंटलाइन वर्कर्स २३,६८८ २३,१०५ ९७.५४

४५ वर्षांवरील व्यक्ती ८,८९,२६५ १,९८,६७९ २२.३४

१८ ते ४४ वर्षे १२,००,००० ९०८९ ०.७५ टक्के

Web Title: 1 lakh citizens in the district waiting for the second dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.