अर्थसहाय योजनेसाठी10 कोटीची तरतुद
By Admin | Published: July 14, 2014 11:05 PM2014-07-14T23:05:54+5:302014-07-14T23:05:54+5:30
अल्पभुधारक शेतकर्यांसाठी राबविण्यात येणार्या अर्थ सहाय्य योजनेसाठी यावर्षी १0 कोटी २0 लाख रूपयाचा निधी मंजूर झाला आहे.
बुलडाणा : आदीवासी व अनुसूचित जाती जमातीच्या अल्पभुधारक शेतकर्यांसाठी राबविण्यात येणार्या अर्थ सहाय्य योजनेसाठी यावर्षी १0 कोटी २0 लाख रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने या योजना राबविल्या जात असुन यामध्ये या नविन विहीरी खोदने, जुन्या विहीरीची दुरूस्ती करणे या बरोबरच पिक संरक्षण औजरे, सुधारीत औजरे, बैलगाडी- जोडी आणि पंपसेट व अनूदानावर पाईप वाटप यांचा समावेश आहे. या योजनेमध्ये नविन विहीरीकरीता अनुदान र्मयादा ७0 हजार ते १ लाख रुपये इतकी राहणार आहे. जे लाभार्थी नविन विहीर या घटकात लाभ घेणार नाहीत त्यांच्यासाठी ५0 हजार रुपये इतकी अनुदान र्मयादा राहणार आहे. या योजनेत नविन विहीरींना प्राधान्य देणात येणार आहे.निधीच्या ७0 टक्के रक्कम ही नविन विहीरी करणे व जुन्या विहीरींची दुरूस्ती यावर खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तर २ हेक्टर पर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकर्यांना प्रथम तर २ ते ४ हेक्टर पर्यंंत क्षेत्र असलेल्या शेतकर्यास द्वितीय प्राधान्य राहील. ४ ते६ हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकरी लाभार्थ्यांस तृतीय प्राधान्य देण्यात येणार आहे.