२७ दिवसांत १0 शेतकरी आत्महत्या

By admin | Published: August 28, 2015 12:21 AM2015-08-28T00:21:16+5:302015-08-28T00:21:16+5:30

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच ; आठ महिन्यांत १0५ आत्महत्या.

10 farmers suicides in 27 days | २७ दिवसांत १0 शेतकरी आत्महत्या

२७ दिवसांत १0 शेतकरी आत्महत्या

Next

बुलडाणा : शेतकरी आत्महत्येचे सत्र बुलडाणा जिल्ह्यात सुरूचआहे. गत आठ महिन्यात जिल्ह्यात १0५ शे तकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून, ऑगस्ट महिन्याच्या २७ दिवसांत १0 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मागील दहा वर्षांमध्ये १६२0 शेतकरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या आ त्महत्याप्रकरणी प्रशासनाने केवळ ६२५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९६९ प्रकरणे नामंजूर केली. दुर्दैवाची बाब म्हणजे, पात्र प्रकरणांपेक्षा अपात्र प्रकरणांचाच आकडा जास्त असल्यामुळे मरणानंतरही या शेतकर्‍यांना न्याय मिळू शकला नाही. जिल्ह्यात सन १ जानेवारी ते २७ ऑगस्ट दरम्यान, नापिकी व कर्जबाजारी झालेल्या १0५ शेतकर्‍यांनी आ त्महत्या केल्याची शासनदप्तरी नोंद आहे. शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये आत्महत्येची कारणे शोधली असता, कर्ज आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही शासनाने केवळ ३५ प्रकरणेच प्रशासनाने पात्र ठरविली, तर १९ आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. ५१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. यावर्षी सुरुवातीला अवकाळी पावसाने जिल्ह्यात िपकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरू असून, २५, २६ आणि २७ ऑगस्ट या तीन दिवसांत पाच शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली. *यावर्षी १९ प्रकरणे ठरविली अपात्र शेतकरी आत्महत्येचे सत्र सन २00५ पासून सुरू झाले. यादरम्यान १६२0 शेतकरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. प्रशासनाने केवळ ६२५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९६९ प्रकरणे नामंजूर केली आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २0१५ या काळात जिल्ह्यात १0५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. यापैकी शासनाने विविध निकष लावून १९ प्रकरणे अपात्र ठरविली. यात आजारपणामुळे दोन, व्यसनाधीनता सहा, अपघात दोन, बेरोजगारी एक आणि घरगुती भांडणातून नऊ शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे शासकीय अहवालात नमूद केले आहे.

Web Title: 10 farmers suicides in 27 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.