लक्झरी बस उलटल्याने १0 जखमी; दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:01 AM2017-09-21T01:01:03+5:302017-09-21T01:05:21+5:30
खामगाव: ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लक्झरी बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी कोलोरी फाट्यानजीक घडली. यात १0 प्रवासी जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लक्झरी बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी कोलोरी फाट्यानजीक घडली. यात १0 प्रवासी जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. छतावरील कॅरिअरमधील लगेजमुळे लक्झरीचा अपघात झाल्याची माहिती असून, अशाप्रकारची ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे. रोडच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या कॅरिअरमधील लगेजला लागू नये म्हणून चालकाने बस दुसर्या बाजूने घेतली. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून बस हॉटेलमध्ये घुसल्याचा अंदाज आहे. क्षमतेपेक्षा जास्त लगेजच्या वाहतुकीमुळे बुधवारी पुन्हा अपघात झाला. इंदोरवरून अकोला जाणारी ट्रॅव्हल्स क्र.एमपी३0-पी ९९९९ समोरील ट्रक क्र.बी.आर.0६-जीए ९0९५ ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकला कट मारून उलटली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील १0 प्रवासी जखमी झाले. या सर्व जखमींना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यातील विजयकुमार व रेखा विजय कुमार या दाम्पत्याची प्रकृती गंभीर असून, त्यांना अकोला रेफर करण्यात आले आहे. सदर ट्रॅव्हल्सवर मोठय़ा वाहनांचे १८ टायर्स, कांदे, खारीक व काही जड साहित्याचे पोते होते. क्षमतेपेक्षा जास्त लगेज असल्यामुळेच चालकाचे नियंत्रण सुटून सदर लक्झरी बसचा अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. लगेजच्या वाहतुकीतून अधिक कमाईची हाव करणारे ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांच्या जीविताशी खेळ करत असल्याचे दिसून येत आहे.