लोकसहभागातून सर्वोत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींना १0 लाख!

By Admin | Published: August 16, 2015 11:54 PM2015-08-16T23:54:36+5:302015-08-16T23:54:36+5:30

काँग्रेसच्यावतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार.

10 lakhs of grampanchayats working best from people's participation! | लोकसहभागातून सर्वोत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींना १0 लाख!

लोकसहभागातून सर्वोत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींना १0 लाख!

googlenewsNext

चिखली (जि. बुलडाणा) : मतदारसंघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासाची कामे राबविल्यास सर्वोत्कृष्ट ठरणार्‍या ग्रामपंचायतींना १0 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देणार असल्याची घोषणा आमदार राहुल बोंद्रे यांनी चिखली व बुलडाणा तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी केली. काँग्रेसच्यावतीने स्थानिक नटराज सभागृहात १४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या समारंभात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अंभोरे होते. विशेष उपस्थिती आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष अलकाताई खंडारे यांची होती.

Web Title: 10 lakhs of grampanchayats working best from people's participation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.