१० रुग्णांची काेराेनावर मात; दोन पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:40 AM2021-08-17T04:40:20+5:302021-08-17T04:40:20+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़ साेमवारी १० जणांनी काेराेनावर मात केली. १२ ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़ साेमवारी १० जणांनी काेराेनावर मात केली. १२ तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही़ संग्रामपूर तालुक्यातील दाेन रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़
पॉझिटिव्ह आलेले रुग्णांमध्ये संग्रामपूर तालुका सोनाळा व पातुर्डा येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ आजपर्यंत ६ लाख ६८ हजार ३२० रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज राेजी १३७७ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ८७ हजार ३५६ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८६ हजार ६५१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविडचे ३३ सक्रिय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
स्वातंत्र्यदिनी एकही नवीन रुग्ण नाही
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल, मे महिन्यांत फ्रंटफूटवर असणारा कोरोना विषाणू आता बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाने नवीन रुग्ण आढळल्यापासून स्वातंत्र्यदिनी खऱ्या अर्थाने ‘स्वातंत्र्य’ दिले़ १५ ऑगसल्ला २ हजार ४६९ तपासणी अहवालांमध्ये एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला नाही.