मराठा मोर्चासाठी १00 बसची व्यवस्था
By admin | Published: September 14, 2016 12:49 AM2016-09-14T00:49:15+5:302016-09-14T00:49:15+5:30
बुलडाणा अर्बनचा पुढाकार; सहकार विद्या मंदिरच्या शाळा बंद राहणार!
बुलडाणा, दि. १३: कोपर्डी येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सोमवार २६ सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चानिमित्त बुलडाणा अर्बन परिवाराच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून मोर्चात सहभागी होणार्या जिल्हय़ातील कार्यकर्त्यांंसाठी संस्थेने १00 बसेसची व्यवस्था केली आहे.
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ बुलडाणा येथे सोमवार २६ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा अभूतपूर्व व भव्य प्रमाणात यशस्वी व्हावा यासाठी बुलडाणा अर्बन परिवारानेदेखील आपल्या स्तरावर नियोजन केले आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी बुलडाणा अर्बन संस्थेच्या मुख्यालयासह जिल्हय़ातील सर्व शाखा व संस्थेच्या सहकार विद्या मंदिराच्या शाळा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर या मोर्चात सहभागी होण्यासाठी बुलडाणा येथे ग्रामीण भागातून येणार्या कार्यकर्ते व नागरिकांसाठी संस्थेने चिखली, उंद्री, धोडप, वरवंड, डोंगरखंडाळा, डोंगरशेवली, बिबी, जानेफह, डोणगाव, सुलतानपूर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, देऊळगावमही, धाड, धामणगावबढे, मोताळा, पिंपळगावराजा, जळगाव जामोद व वरवट बकाल येथून बसेसची व्यवस्था केली आहे. मोर्चासाठी सोडण्यात येणार्या बसेसमध्ये त्या-त्या भागातील महिला मोर्चेकर्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
यासाठी मोर्चात सहभागी होणार्या कार्यकर्त्यांंनी आपल्या भागातील बुलडाणा अर्बनच्या शाखा व्यवस्थापक व शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून मोर्चात सहभागी होणार्या प्रतिबस ४0 या प्रमाणे लोकांची यादी सादर करावी.