सुभानपुरात १०० टक्के काेराेना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:00+5:302021-07-18T04:25:00+5:30
सुरुवातीला गावातील ४५ वर्षांपेक्षा जास्त असलेले लाभार्थी लस घेण्यासाठी उत्सुक नव्हते. मात्र, आराेग्य विभागाने केलेल्या जनजागृतीनंतर सर्वच ग्रामस्थांनी लस ...
सुरुवातीला गावातील ४५ वर्षांपेक्षा जास्त असलेले लाभार्थी लस घेण्यासाठी उत्सुक नव्हते. मात्र, आराेग्य विभागाने केलेल्या जनजागृतीनंतर सर्वच ग्रामस्थांनी लस घेतली आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी मगर, आरोग्य सेविका रूपाली तांबेकर, शिक्षिका शालिनी मगर, आशा गटप्रवर्तक शिराळे ताई, अंगणवाडी सेविका सुरेखा काळे, आशा सेविका सुनीता लोढे, अनसूया भराड, परिचर हितेश राठोड, माजी सरपंच विजय काळे, आरोग्य सहायक डी.जी. जगताप आदींनी परिश्रम घेतले.
प्रत्येक गावातील सरपंच समाजसेवी यांनी पुढाकार घेऊन आपले गाव १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करावेत, तसेच लस घेतल्यानंतरसुद्धा सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे याकडे विशेष लक्ष द्यावे.
डॉ. विशाल मगर, तालुका आरोग्य अधिकारी, मेहकर