जिल्ह्यात ८१ शाळांचा १०० टक्के निकाल

By admin | Published: June 14, 2017 12:55 AM2017-06-14T00:55:52+5:302017-06-14T00:55:52+5:30

बुलडाणा : दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला असून , बुलडाणा तालुक्याचा निकाल ९१.१६ टक्के लागला आहे.

100 percent result of 81 schools in the district | जिल्ह्यात ८१ शाळांचा १०० टक्के निकाल

जिल्ह्यात ८१ शाळांचा १०० टक्के निकाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला असून , बुलडाणा तालुक्याचा निकाल ९१.१६ टक्के लागला आहे. जिल्ह्याने यावर्षी दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यातील ५४० पैकी ८१ शाळांनी १०० टक्के निकाल देऊन जिल्ह्यात अव्वल ठरल्या. तर शून्य टक्के निकालाची बुलडाणा तालुक्यातील एक शाळा आहे, तर जिल्ह्यातील पाच शाळांनी ५० टक्केच्या खाली निकाल दिला. जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ५४० शाळांमध्ये ४० हजार ७९६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० हजार ६५२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात दहावीची परीक्षा दिली होती. यातून ३५ हजार ९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात बुलडाणा तालुक्यातील सर्वाधिक १५ शाळांनी निकाल १०० टक्के दिला. सिंदखेडराजा व खामगाव प्रत्येकी ९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. तर चिखली ७, मेहकर ६, दे.राजा ५, लोणार ४, मोताळा ६, नांदूरा १, मलकापूर २, शेगाव ३, संग्रामपूर ३, ज.जमोद २ अश्या एकूण ८१ शाळांनी १०० टक्के निकाल देत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले.

Web Title: 100 percent result of 81 schools in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.