एमईएस फार्मसी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:59+5:302021-09-08T04:40:59+5:30

महाविद्यालयाची ऐश्वर्या राजू दिवाणे ही विद्यार्थिनी ९१.५० टक्के गुणांसह प्रथम, अनिकेत गणेश शर्मा ९१ टक्के गुणांसह द्वितीय, तर शिवकन्या ...

100% result of MES Pharmacy College | एमईएस फार्मसी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

एमईएस फार्मसी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

Next

महाविद्यालयाची ऐश्वर्या राजू दिवाणे ही विद्यार्थिनी ९१.५० टक्के गुणांसह प्रथम, अनिकेत गणेश शर्मा ९१ टक्के गुणांसह द्वितीय, तर शिवकन्या संतोष खनपटे ही विद्यार्थिनी ८९.९० टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. प्रथम वर्षाला एकूण ६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ३९ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, तर ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम वर्षाचासुद्धा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम वर्षाचे शेख महंमद रेहान रब्बानी ८९.८२ टक्के गुणांसह प्रथम, खान तौकीर आलम असिफ ८८.४६ टक्के गुणांसह द्वितीय, तर वैष्णवी सुरेश इंगळे ही ८३.३६ टक्के गुणांसह तिसरी आली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र अवस्थी, सचिव हर्षल सोमण यांच्यासह संचालक मंडळ, प्राचार्य सुधीर मुळे व सर्व प्राध्यापकवर्गाने अभिनंदन केले आहे.

Web Title: 100% result of MES Pharmacy College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.