मेहकर तालुक्यात तीन शाळांचा १०० टक्के निकाल
By admin | Published: May 31, 2017 12:22 AM2017-05-31T00:22:13+5:302017-05-31T00:22:13+5:30
मेहकर : तालुक्यातील शाळांचा इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल ९२.२१ टक्के लागला आहे. यावर्षी तालुक्यातून २७०१ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : तालुक्यातील शाळांचा इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल ९२.२१ टक्के लागला आहे. यावर्षी तालुक्यातून २७०१ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मेहकर येथील महेश विद्यामंदिर आणि ज्यूनिअर कॉलेज व तालुक्यातील जगदंबा ज्यू. कॉलेज उकळी सुकळी या शाळेचा सर्वाधिक म्हणजे १०० टक्के निकाल लागला आहे.
तालुक्यातील श्री शिवाजी कनिष्ट महाविद्यालय मेहकर सायन्स ९८.८२, आर्ट ९५.३१, एकूण ९७.८६ टक्के, मेएसो कला व वाणिज्य ज्यू.कॉलेज मेहकरचा निकाल आर्ट ७९.४१, कॉमर्स ९५.३१, एकूण ८९.७९ टक्के, मेऐसो विज्ञान व कला ज्यू.कॉलेज चा निकाल सायन्स ९९.१८, आर्ट ९७.०१, एकूण ९८.४२ टक्के, विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय हिवराआश्रम सायन्स ९५.०७, आर्ट ६०.७८, एकूण ८६.०१ टक्के, श्री सरस्वती वाणिज्य महाविद्यालय जानेफळ सायन्स १००, आर्ट ९२.८६, एकूण ९५.८२ टक्के, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय डोणगाव सायन्स १००, आर्ट ९७.२४, कॉमर्स ९८.७६, एकूण ९८.३२ टक्के, श्री आ.प.पाटील कनिष्ठ महाविद्यालय नायगाव शेंदला सायन्स ९८.७०, आर्ट ८४.२४, एकूण ९३.१२ टक्के, श्री सरस्वती विज्ञान विद्यालय देऊळगाव साकर्शा आर्ट ७८.७८, संजय गांधी हायस्कूल घाटबोरी आर्ट ९१.८८, महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव माळी सायन्स ९८.३३, आर्ट १००, एकूण ९९.१३ टक्के, फक्रुद्दीन अली अहमद उर्दू विद्यालय डोणगाव सायन्स १००, आर्ट ९३.५४, एकूण ९६.७७, बाबूराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय लोणीगवळी आर्ट ७०.३१, काकासाहेब भास्करराव शिंगणे कला कनिष्ट महाविद्यालय वडगाव माळी आर्ट ७५, माध्यमिक क.म. चायगाव आर्ट ७६.१९, कला व विज्ञान महाविद्यालय मेहकर सायन्स ९८.३३, आर्ट ८०.७६, एकूण ९०.१७ टक्के, राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालय अंत्री देशमुख आर्ट ८८.०९, भाऊसाहेब लोढे कनिष्ट महाविद्यालय कळंबेश्वर आर्ट ८०.००, मदन वामन पातुरकर कनिष्ट महाविद्यालय डोणगाव सायन्स ९७.६१, पीर मोहंमद उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय मेहकर सायन्स ९७.२२, आर्ट ५५.५५, एकूण ८८.८६ टक्के, जिजामाता आश्रमशाळा चिंचाळा सायन्स ८७.०३, आर्ट ८८.५२, एकूण ८७.८२ टक्के, जिजामाता कनिष्ट महाविद्यालय हिवरा खुर्द आर्ट ८१.२६, शिवाजी कनिष्ट महाविद्यालय मेहकर एमसीव्हीसी ८४.६२, एम.ई.एस.हायस्कूल एम.सी.व्ही.सी.मेहकर ९४.२०, विवेकानंद एमसीव्हीसी हिवरा आश्रम ९५.३४, आ.प.पाटील कनिष्ठ महाविद्यालय नायगाव शेंदला एमसीव्हीसी ८३.८२ टक्के निकाल लागला आहे.