सात मतदारसंघात १0१ उमेदवार रिंगणात
By admin | Published: October 2, 2014 12:35 AM2014-10-02T00:35:05+5:302014-10-02T00:35:05+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघात १0१ उमेदवार रिंगणात.
बुलडाणा : विधानसभा निवडणूकीत बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक बंडोबांना आमीषांचा नैवद्य दाखवून शांत करण्यात आले. आज तब्बल ५९ उमेदवारांनी अर्ज मागे घे तले असल्यामुळे सात मतदारसंघामध्ये १0१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
या वर्षी उमेदवारी दाखल करण्याची एकच भाऊगर्दी उसळली होती. छानणीनंतर १६0 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी ५९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक म तदारसंघामध्ये चौरंगी व पंचरंगी अशी लढत होऊ लागली आहे. महायुती व आघाडी दुभंगल्यानंतर सर्वच मतदारसंघांमध्ये महत्वाच्या पक्षांचे किमान पाच उमेदवार रिंगणात आहे. स्वबळाचे बळ आजमाविण्यासाठी बंडखोरांची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कसरत उमेदवारांना करावी लागते.
सिंदखेडराजा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी सभापती रियाजखाँ पठाण यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीतील संभाव्य बंडखोरी टाळली.
खामगावातही भाजपासमोरचे मतविभाजनाचे संकट अमोल अंधारे व कैलास फाटे यांच्या उमेदवारी अर्ज माघारीने कमी झाले आहे. जळगाव जामोदमध्ये सामाजिक समिकरणे समोर ठेवत बारी समाजातून उमेदवार रिंगणात राहू नये असा प्रयत्न केला गेला मात्र त्याला यश आले नाही. मेहकर म तदारसंघात राष्ट्रवादीच्या विरोधात बंडाचे निशाण फडकाविणार्या मंदाकिनी कंकाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळावे म्हणून या मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. या मतदारसंघात १५ उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान ३ वाजेपर्यंत या घडामोडी अतिशय वेगवान झाल्या हो त्या. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.