१०६ जणांची काेराेनावर मात, ५५ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:49+5:302021-06-16T04:45:49+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी १०६ जणांनी काेराेनावर मात केली़ तसेच ५५ जणांना ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी १०६ जणांनी काेराेनावर मात केली़ तसेच ५५ जणांना अहवाल पाॅझिटिव्ह आला असून दाेघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दाेन हजार ६३ अहवाल निगेटिव्ह आला आहे़
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ०१, बुलडाणा तालुका भडगाव १, मलकापूर तालुका वाकोडी १, सिं.राजा तालुका : किनगाव राजा २, कुंबेफळ १, संग्रामपूर तालुका बोरखेड १, दे. राजा शहर २, दे. राजा तालुका नारायणखेड १, पांगरी १, पिंपळगांव चि ४, जांभोरा २, खामगांव शहर ८, खामगांव तालुका गोंधनापूर १, चिखली शहर ३, चिखली तालुका अंबाशी १, रस्तळ १, इसोली १, सातगांव भुसारी १, शेगांव शहर ३, शेगांव तालुका मनसगांव ३, गोळेगांव १, जानोरी १, पलोदी १, भोनगांव १, पळशी १, मेहकर तालुका : खामखेड १, जळगांव जामोद शहर १, जळगांव जामोद तालुका सुनगांव १, लोणार शहर २, लोणार तालुका येवती १, आरडव १ व इतर जिल्ह्यांतील चार जणांचा समावेश आहे़ उपचारादरम्यान मोताळा येथील ७० वर्षीय महिला, केसापूर ता. बुलडाणा येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत ५ लाख ३१ हजार ६३० रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८५ हजार १०२ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
२५७ रुग्णांवर उपचार सुरू
आज रोजी ७६४ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८६ हजार ०८ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ८५ हजार १०२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात २५७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.