१०८ रुग्णवाहिका ठरली जीवनदायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:21+5:302021-05-04T04:15:21+5:30
दाेन गावांसाठी टॅंकर मंजूर माेताळा : तालुक्यातील टेकडी तांडा आणि पाेफळी या गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर मंजूर करण्यात आले ...
दाेन गावांसाठी टॅंकर मंजूर
माेताळा : तालुक्यातील टेकडी तांडा आणि पाेफळी या गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर मंजूर करण्यात आले आहेत. टेकडी तांडा येथे ३५० लाेकसंख्येसाठी एक तर पाेफळी येथे दाेन टॅंकर मंजूर करण्यात आले आहेत.
अमडापुरात पावसाची हजेरी
अमडापूर : परिसरात रविवारी सायंकाळी अचानक जाेरदार पाऊस झाला. वादळासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली़ तसेच भाजीपाल्यासह उन्हाळी पिकांचे पावसामुळे नुकसान झाले.
अवैध हातभट्ट्यांवर पाेलिसांची धाड
बुलडाणा : शहराला लागून असलेल्या सुंदरखेड येथील झीरा आणि बाळकुंड नाला परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर अतिरिक्त पाेलीस अधीक्षक बजरंग बनसाेडे यांच्या पथकाने धाड टाकून २ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. यावेळी अवैध दारु गाळणारे १२ आराेपी पसार झाले.
पक्षकारांनी दक्षता घेण्याचे आवाहन
बुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता येणाऱ्या पक्षकारांची संख्या विचारात घेता, कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पीक कर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी
बुलडाणा : शेतकऱ्यांनी बँकांकडून बिनव्याजी कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड करण्याची मुदत ३१ मार्च होती. मात्र, कोरोनामुळे अनेक दिवस बँक बंद होती. त्यामुळे पैसे भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मराठवाड्यातून रेतीची अवैध वाहतूक
लोणार : शहरातून नियमबाह्य रेती वाहतूक होत असल्यामुळे नागरिकांना वाहनातून उडणाऱ्या रेतीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मराठवाड्यातील अवैध रेतीचा केंद्रबिंदू लोणार शहर आहे. जवळपास १०० रेतीचे टिप्पर नियम धाब्यावर ठेवून खुलेआम रेतीची वाहतूक करत आहेत. या वाहनांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न जनतेला पडला आहे.
गहू काढणीचे दर वाढले
बुलडाणा : जिल्ह्यात सध्या गहू काढणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना गहू हार्वेस्टरद्वारे काढण्यासाठी एकरी दोन हजार रुपये मोजावे लागले. हरभरा काढणीच्या दरातही वाढ झाली आहे.
तलावाचे सौंदर्य दडले झाडाआड
बुलडाणा : येथील इंग्रजकालीन तलावाचे सौंदर्य झाडाझुडपांआड दडल्याचे दिसून येते. तलाव काठावर बेशरमीचेही प्रमाण वाढले आहे. शहरात अनेक ऐतिहासिक तलाव आहेत. अस्वच्छतेमुळे तलाव परिसरात दुर्गंधी येते.
सिमेंट दरवाढीचा बांधकामाला फटका
बुलडाणा : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.
सिटी स्कॅनचे शासकीय दर नावालाच
बुलडाणा : शहरासह जिल्ह्यात महिन्याकाठी चार ते पाच हजारांवर सीटी स्कॅन केले जात आहेत. मात्र, शासकीय दराऐवजी मनमानी पध्दतीने सीट स्कॅनसाठी दराची आकारणी केली जात असल्याचे वास्तव समोर येत आहेे.
विहिरीत धरणातून पाणीपुरवठा
दुसरबीड : गावालगत एक ग्रामपंचायतीची शासकीय विहीर आहे. त्या विहिरीत मांडवा धरणातून पाणीपुरवठा होतो. विहिरीत अतिरिक्त पाणीसाठा होत असल्याने ते पाणी इतर गावांना टँकरने पुरविले जाते. दुसरबीड येथे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.