११ उमेदवारांनी मैदान सोडले १२ कायम

By admin | Published: October 2, 2014 12:12 AM2014-10-02T00:12:11+5:302014-10-02T00:12:11+5:30

चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी प्रचंड सामाजिक ध्रुवीकरणांची शकत्या.

11 candidates left the ground for 12 | ११ उमेदवारांनी मैदान सोडले १२ कायम

११ उमेदवारांनी मैदान सोडले १२ कायम

Next

चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी प्रचंड सामाजिक ध्रुवीकरणांची गणिते मांडली जात आहेत. महायुती असताना भाजपाने प्रतिष्ठेची केलेली ही जागा आपल्याकडे कायम ठेवत भाजपचा उमेदवार रिंगणात उतरविला आहे. मात्र येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना यांच्यामध्ये चौरंगी लढत होत आहे. आज ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात १२ उमेदवार आहेत. त्यात सुरेशअप्पा खबुतरे भाजपा, नवृत्ती जाधव बसपा, धृपदराव सावळे राष्ट्रवादी, राहूल बोंद्रे काँग्रेस, प्रतापसिंग राजपूत शिवसेना, विनोद खरपास मनसे, विजय खरात भारिप, तुषार गुजर अखिल भारत हिंदू महासभा, राजेश गवई बहुजन मुक्ती पार्टी, अयाज अहेमद हबीब अहेमद कुरेश अपक्ष, गणेश बाहेकर अपक्ष, दगडू साळवे अपक्ष यांचा समावेश आहे. तर अर्ज मागे घेणार्‍यांमध्ये विलास शेगांवकर रिपाई, इमान खान उमर खान, प्रदीप अंभोरे, दत्तात्रय खरात, मोहफीज तौफिक, देवानंद गवई, देविदास जाधव, प्रमोद पाटील, जालींदर बुधवत, श्रीराम सपकाळ, सविता बाहेकर यांचा समावेश आहे.

Web Title: 11 candidates left the ground for 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.