कोरोनाकाळात ११ टक्क्यांनी घरफोड्यांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:10+5:302020-12-31T04:33:10+5:30
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नाकेबंदी करण्यात आली होती. पोलिसांचाही बंदोबस्त प्रतिबंधित क्षेत्रात वाढविण्यात आला होता. चोरीच्या घटनांमध्ये वाढ ...
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नाकेबंदी करण्यात आली होती. पोलिसांचाही बंदोबस्त प्रतिबंधित क्षेत्रात वाढविण्यात आला होता. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सकृत्दर्शनी समोर येत आहे. जिल्ह्यात बुलडाणा शहरासह धाड, मढ, सागवान, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोदसह शेगाव तालुक्यातही चोरीच्या घटना प्रामुख्याने घडल्या आहेत.
लॉकडाऊनच्या दरम्यान व मिशन बीगिन अगेनच्या काळात मराठवाड्यालगतच्या पट्ट्यातून धाड परिसरात चोरटे थेट प्रवेश करून चोऱ्या करत होते. या भागात ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग केला असता, पळ काढत ठरावीक अंतरावर थांबून ग्रामस्थांनाच चोरट्यांनी प्रतिआव्हान दिल्याचे सर्वश्रुत आहे. त्यातच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महि्न्यांच्या कालावधीतही चोरीच्या घटनांत बुलडाणा शहर परिसरात वाढ झाली आहे. दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी चोरीच्या घटना घडत आहेत.
घरफोडीच्या घटना
२०१९
एकूण घरफोड्या : २१९
तपास पूर्ण : ४०
२०२०
एकूण घरफोड्या : २३३
तपास पूर्ण : ६०
खुनाच्या घटनांत दुपटीने वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ३० खून झाले होते तर २०२० मध्ये ४५ खुनाच्या घटना झाल्या. यापैकी ९३ टक्के प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांमध्ये जिल्ह्यात २०२० मध्ये वाढ झाली असून, तब्बल ६५ घटनांमध्ये खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.