अनुराधा फार्मसीचे ११ विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:36 AM2021-02-11T04:36:16+5:302021-02-11T04:36:16+5:30
चिखली : स्थानिक अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या तब्बल ११ विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादित करीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता ...
चिखली : स्थानिक अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या तब्बल ११ विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादित करीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत.
अमरावती विद्यापीठाने बी.फार्म अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या १० जणांची गुणवत्ता यादी ५ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केली आहे़. या एकूण १० मध्ये अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या ८ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करण्याचा बहुमान मिळविला आहे. तर एम. फार्म क्वॉलिटी अशुरन्स या पदव्युत्तर पदवी विद्याशाखेतून एका विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकावला आहे़ तर विद्यापीठाच्या गुणवत्तायादीत विद्यापीठातून प्रथम मेरीट येण्याचा मान जयश्री मानवतकर हिने मिळविला असून तिला ८.६४ गुण मिळाले आहेत. तर भाग्यश्री भुतेकर हिने ८.६१ गुण संपादन करून दुसरे स्थान मिळविले आहे. चौथ्या स्थानावर ८.३३ गुणांसह आंचल सुनील कांबळे, पाचव्या स्थान अश्विनी भुतेकर हिने पटकाविले असून ८.३२ गुण संपादन केले, मनोहर गदादे याने ८.३० गुण मिळवून सहावे, किरण भारसाकळे ८.२९ गुण मिळवून सातवे, मारोती दिवटे याने ८.२६ गुण मिळवून नववे तर श्वेता लेंभे, सीमा मानमोडे आणि शेख मोहसिन शेख मोहम्मद तिघांनी समान ८.२५ गुण मिळवून दहावे स्थान मिळविले आहे. तर एम.फार्म क्वॉॅलिटी अशुरन्स या पदव्युत्तर पदवी विद्याशाखेतून ८.४८ गुण संपादन करून गुणवत्ता यादीत तिसरे स्थान निशा गडीया हिने पटकाविले आहे. संस्थेच्या या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब बोंद्रे, सचिव तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ़ व्ही.आर.यादव, विश्वस्त सिध्देश्वर वानेरे, सलिमोददीन काझी, आत्माराम देशमाने, अनंतराव सराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी, प्राचार्य डॉ. आर. एच. काळे व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. एका छोटेखानी कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा !
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठअंतर्गत एकूण २१ फार्मसी महाविद्यालयांतून दरवर्षी विद्यापीठात प्रथम येणाऱ्या १० विद्यार्थ्यांची दीक्षांत समारंभापूर्वी गुणवत्ता यादी जाहीर करीत असते. या गुणवत्ता यादीत अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीचे तब्बल ११ विद्यार्थी झळकण्यासह महाविद्यालयातील बी.फार्मची विद्यार्थिनी जयश्री मानवतर हिने विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.