जिल्ह्यातील ११३५ जणांची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:14+5:302021-05-05T04:56:14+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग वाढत असला तरी बरे हाेणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने दिलासा मिळाला आहे़ साेमवारी जिल्ह्यातील ११३५ ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग वाढत असला तरी बरे हाेणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने दिलासा मिळाला आहे़ साेमवारी जिल्ह्यातील ११३५ जणांनी काेराेनावर मात केली तसेच १२७५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ उपचारादरम्यान ८ जणांचा मृत्यू झाला असून आणखी ७२८ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़
पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहर व तालुका १०१, खामगांव शहर व तालुका १०, शेगांव शहर व तालुका ९८, दे. राजा तालुका व शहर : २६७, चिखली शहर व तालुका १०, मेहकर शहर व तालुका ७, मलकापूर शहर व तालुका १, नांदुरा शहर व तालुका ४, लोणार शहर व तालुका ६९, मोताळा शहर व तालुका ७९, जळगांव जामोद शहर व तालुका ५८, सिं. राजा शहर व तालुका २२ आणि संग्रामपूर शहर व तालुक्यातील दाेघांचा समावेश आहे़ त्याचप्रमाणे उपचारादरम्यान केसापूर (ता. बुलडाणा) येथील ३६ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ५५ वर्षीय पुरुष, खंडाळा म. (ता. चिखली) येथील ४२ वर्षीय पुरुष, पोरज (ता. खामगाव) येथील ७१ वर्षीय महिला, जळगाव जामोद येथील ५५ वर्षीय पुरुष, राहुड (ता. खामगाव) येथील ८० वर्षीय पुरुष, कुंबेफळ (ता. खामगाव) येथील ८५ वर्षीय पुरुष, निमगाव (ता. नांदुरा) येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत ४२७ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आज रोजी ५ हजार ७१० नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ३ लाख ६४ हजार ४८७ आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ६६ हजार ७१० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ५९ हजार ७६५ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ६ हजार ५७८ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच आजपर्यंत ४२७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.