जिल्ह्यातील ११४३ बाधितांची कोरोनावर मात, १००३ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:12+5:302021-05-03T04:29:12+5:30
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,८१० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३,८०७ जणांचे ...
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,८१० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३,८०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात १५७, खामगाव ८०, शेगाव ६०, देऊळगाव राजा २१, चिखली ३६, मेहकर १७३, मलकापूर १८, नांदुरा ९८, लोणार १३१, मोताळा ४३, जळगाव जामोद ८१, सिंदखेड राजा ७९, संग्रामपूर तालुक्यातील २६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, देऊळगाव राजातील दुर्गापुरा येथील २१ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील ४६ वर्षीय व्यक्ती, खंडाला येथील ६६ वर्षीय व्यक्ती, खामगावातील सजनपुरी येथील ७५ आणि ६० वर्षीय व्यक्ती तसेच ६५ आणि ८२ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासोबतच जळगाव जामोद तालुक्यातील तिवडी येथील ६२ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवारी एकूण आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
-- ३,६३,२१२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह--
कोरोनाच्या तपासणीसाठी संदिग्धांच्या घेण्यात आलेल्या अहवालापैकी ३ लाख ६३ हजार २१२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ५८ हजार ६३० कोरोनाबाधितांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे. रविवारी ५,८७८ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६५ हजार ९८२ झाली असून, त्यापैकी ६ हजार ९३३ जण सक्रिय असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.