बुलडाणा जिल्ह्यात ११८ पॉझिटिव्ह; २९ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:18 PM2020-10-17T13:18:11+5:302020-10-17T13:18:24+5:30

३१३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ११८ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत.

118 positives in Buldana district; 29 corona free | बुलडाणा जिल्ह्यात ११८ पॉझिटिव्ह; २९ रुग्ण कोरोनामुक्त

बुलडाणा जिल्ह्यात ११८ पॉझिटिव्ह; २९ रुग्ण कोरोनामुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या १५ दिवसापासून दररोज सरासरी २५ च्या आसपास असणारी कोरोना बाधीतांची संख्या १६ आँक्टोबर रोजी अचानक वाढली असून तब्बल ११८ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर २९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना  रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
शुक्रवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रँपीड टेस्ट केलेल्या ४३१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३१३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ११८ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत. पाँझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा सहा, अंभोडा एक, नागझरी एक, बोडखा एक, सावरा एक, तिंत्रव एक, कठोरा दहा, मनसगाव एक, जलंब एक, शेगाव दहा, पांगरखेड एक, हिवरा आश्रम एक, उकळी एक, मेहकर तीन, खामगाव पाच, घाटपुरी पाच उमरा अटाळी एक, हिवरखेड तीन, लोणार एक, जळगाव जामोद दोन, चिखली आठ, सवडत एक, सवना दोन, वाघापूर एक, एकलारा एक, साखरखेर्डा १२, लिंगा दोन, सिंदखेड राजा एक, नांदुरा १६, नारखेड तीन, पिंपळखुटा धांडे तीन, मलकापूर तीन, मोताळा एक, सावरगाव जहाँगिर दोन, पोफळी एक, धानोरा एक, धामणगाव बढे एक, चिंचोळा एक, आणि वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील एकाचा यात समावेश आहे.
दरम्यान, २९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये  बुलडाणा येथील अपंग शाळा केअर सेंटरमधून  पाच, आयुर्वेदिक महाविद्यालय एक, खामगाव एक, देऊळगाव राजा सहा, नांदुरा एक, लोणार चार, जळगाव जामोद दोन, चिखली नऊ या प्रमाणे कोरोनामुक्त झालेल्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत ३५,५९३ संशयीतांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर ७,८२३ बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान गेल्या १५ दिवसामध्ये जिल्ह्यात ५ हजार ९०५ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये रॅपीड, आरटीपीसीआर, ट्रुनॅट तपासण्यांचा समावेश आहे. तर गेल्या १५ दिवसामध्ये २९ जणांचा जिल्ह्यात काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. 

Web Title: 118 positives in Buldana district; 29 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.