बीएचआरच्या १२ संचालकांना न्यायालयीन कोठडी

By admin | Published: March 20, 2015 12:54 AM2015-03-20T00:54:04+5:302015-03-20T00:54:04+5:30

देऊळगावराजा शाखेत चार कोटी रूपयाची फसवणूक केल्याचे प्रकरण.

12 directors of BHR judicial custody | बीएचआरच्या १२ संचालकांना न्यायालयीन कोठडी

बीएचआरच्या १२ संचालकांना न्यायालयीन कोठडी

Next

देऊळगावराजा (बुलडाणा): राज्यभरात भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचा घोटाळा गाजत असताना देऊळगावराजा शाखेत चार कोटी रूपयाची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिस्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी बारा संचालकांना बुधवारी अटक केली होती. गुरूवारी त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. राज्यात बीएचआर पतसंस्थेच्या २६८ शाखा असून देऊळगावराज येथील शाखेत आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांनी करोडो रूपयाची गुंतवणूक केली होती. वारंवार मागणी करूनही ही रक्कम परत न मिळाल्यामुळे सौ.रंजना अनिल सावजी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणेदार ए.के.हिवाळे यांनी १२ संचालका विरूध्द गुन्हे दाखल केले होते. बुधवारी जळगाव खान्देश येथून पीएसआय बळीराम सांगळे व त्यांच्या पथकाने बीएचआर च्या पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद हिराचंद रायसोनी संचालक राजाराम काशिनाथ कोळी, भगावान हिरामन वाघ, शे.रमजान शे.नबी, इंद्रकुमार ललवाणी, भागवत संपत माळी, दिलीप कांतीलाल चोरडिया, डॉ.हितेंद्र यशवंत महाजन, दादा रामचंद्र पाटील, यशवंत ओंकार गिरी, मोतीलाल ओंकार गिरी, सुरजमल जैन या बारा आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: 12 directors of BHR judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.