कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू, ८५८ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:55+5:302021-04-22T04:35:55+5:30
दरम्यान, मृत्यू झालेल्यांमध्ये खामगाव तालुक्यातील शिरसगाव येथील ६८ वर्षीय पुरुष, खामगावातील केशवनगरमधील ४५ वर्षीय पुरुष, खामगावातीलच ४५ वर्षीय ...
दरम्यान, मृत्यू झालेल्यांमध्ये खामगाव तालुक्यातील शिरसगाव येथील ६८ वर्षीय पुरुष, खामगावातील केशवनगरमधील ४५ वर्षीय पुरुष, खामगावातीलच ४५ वर्षीय महिला, रोहणा येथील ६५ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातीलच सारोळा येथील ६२ वर्षीय पुरुष, समन्वयनगरमधील मधील ३५ वर्षीय पुरुष, सती फैलातील ७१ वर्षीय पुरुष, शेगावातील आरोग्य कॉलनीमधील ५२ वर्षीय महिला, मेहकर तालुक्यातील वर्दडी येथील ५५ वर्षीय महिला, बुलडाण्यातील ४६ वर्षीय पुरुष चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील ६० वर्षीय पुरुष आणि चिखली तालुक्यातील अमडापूर येथील ६१ वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे.
बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्ट किटद्वारे तपासण्यात आलेल्या ५ हजार ३८६ अहवालांपैकी ४ हजार ५२८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ८५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४१५ व रॅपीड टेस्टमधील ४४३ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ९९१ तर रॅपिड टेस्टमधील ३,५३७ अहवालांचा समावेश आहे.
दुसरीकडे पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ९०, खामगाव तालुक्यातील ७४, शेगाव तालुक्यातील २०, देऊळगाव राजा तालुक्यातील १११, चिखली तालुक्यातील ९६, मेहकर तालुक्यातील ५२, मलकापूर तालुक्यातील ३८, नांदुरा तालुक्यातील ८०, लोणार तालुक्यातील ७३,मोताळा तालुक्यातील ३३, जळगाव जामोदमधील ४८, सिंदखेड राजातील १३९, संग्रामपूरमधील चार जणांचा यात समावेश आहे.
दुसरीकडे बुधवारी ५२८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोबतच आजपर्यंत तपासण्यात आलेल्यांमध्ये ३ लाख १३ हजार २०१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ५४ हजार ८२१ झाली असून त्यापैकी ४७ हजार १४२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
--६,८१५ अहवालांची प्रतीक्षा--
बुधवारी ६ हजार ८१५ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आले असून वर्तमान स्थितीत जिल्ह्यात ७ हजार ३२६ सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ३५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २१ एप्रिल रोजीचा जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.३९ टक्के असून जिल्ह्याचा एकूण मृत्यूदर हा ०.६४ टक्के आहे.