१२ लाख रुपयांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:49 PM2017-10-05T23:49:02+5:302017-10-05T23:50:15+5:30
चिखली: शहरातील मध्यवस्तीत असलेल्या दुकानातून व दुकान मालकाच्या गोडावूनमधून बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू विकताना दुकान मालकासह एका इसमाविरोधात अन्न-औषध व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करून १२ लाख ५ हजार ७४0 रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू व मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: शहरातील मध्यवस्तीत असलेल्या दुकानातून व दुकान मालकाच्या गोडावूनमधून बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू विकताना दुकान मालकासह एका इसमाविरोधात अन्न-औषध व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करून १२ लाख ५ हजार ७४0 रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू व मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक बाबू लॉजजवळील रईस र्जदा या दुकानातून बंदी असलेला गुटका व सुगंधी तंबाखूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने अन्न व सुरक्षा अधिकारी माहुरे यांनी आपल्या सहकार्यांसह चिखली ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचार्यांच्या मदतीने ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रईस र्जदा या दुकानाची झाडाझडती घेऊन मालक रईस कुरेशी (वय ३२) याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून दुकानापासून जवळ असलेल्या त्याच्यात गोडावूनमध्ये असलेला गुटका व सुगंधी तंबाखू ताब्यात घेतला. त्यावेळी तिथे अजीम खा उस्मान खा (वय ३७) याला ताब्यात घेतले. या कारवाईत जप्त केलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखू आणि इतर मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाख ५ हजार ७४0 रुपये असून, जप्त केलेला मुद्देमाल बुलडाणा येथील मुख्य कार्यालयात नेण्यात आला असून, पुढील कारवाई सुरूआहे.
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहुरे, संतोष सुरोशिया, किशोर साळुंके, कर्मचारी श्रीकांत मोरे, समाधान जाधव, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद देशमुख, उपनिरीक्षक गवारगुरू, राजू सोनुने, शोगोकर, यांच्यासह महिला कर्मचार्यांचा समावेश होता. गुटखा जप्तीची ही कारवाई सुमारे ३ ते ४ तास चालली. या कारवाईने प्रतिबंधित गुटखा विक्रीचे केंद्र बनलेल्या चिखलीतील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.