जिल्ह्यात १२ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली; टीव्ही, फ्रीज, बाइक तरी मोफत रेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:19+5:302021-07-30T04:36:19+5:30
जिल्ह्याची लोकसंख्या - २५,८६,२५८ एकूण रेशन कार्डधारक - ५,४८,०३० दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक (अंत्योदय योजना) - ६३,३९४ कोणत्या तालुक्यात किती तालुका ...
जिल्ह्याची लोकसंख्या - २५,८६,२५८
एकूण रेशन कार्डधारक - ५,४८,०३०
दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक (अंत्योदय योजना) - ६३,३९४
कोणत्या तालुक्यात किती
तालुका दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक (अंत्योदय योजनेतील)
बुलडाणा ६,६४७
चिखली ४,०१३
देऊळगाव राजा २,७४१
जळगाव जामोद ४,९५७
खामगाव ४,४७८
लोणार ६,२२६
मलकापूर ४,३४३
मेहकर ५,३२१
मोताळा ५,५६८
नांदुरा ६,०७७
संग्रामपूर ५,९९६
शेगाव २,९७०
सिंदखेड राजा ४,०५७
दारिद्र्यरेषेखालीचे निकष काय?
१५ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना दारिद्र्यरेषेखाली समजण्यात येते. सध्या बुलडाणा जिल्ह्यात अंत्योदय योजनेत असलेले ६३ हजार ३९४ कार्डधारक दारिद्र्यरेषेखाली आहेत. तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांमध्येही काही लाभार्थी हे दारिद्र्यरेषेखालील आहेत. अगोदर दारिद्र्य ठरवताना व्यक्तीचे उत्पन्न किती आहे हे पाहिले जात होते. परंतु आता नवीन निकषानुसार राहणीमानाचा दर्जा गृहीत धरून तसेच घर, शिक्षण, स्वच्छता इत्यादी पाहिले जाते.
दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावा
जिल्हा पुरवठा विभागाकडून दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावा घेऊन अपात्र शिधापत्रिकाधारकांचे सर्वेक्षण मोहीम काही महिन्यांपूर्वी राबविण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच ही मोहीम स्थगित झाल्याने जिल्ह्यातील किती लोक प्रत्यक्षात दारिद्र्यरेषेखालील आहेत, हे कळू शकले नाही.
कोण गरीब, कोण श्रीमंत? १७ लाख लोकांना मोफत रेशन!
सध्या गोरगरिबांना मोफत रेशन देण्यात येत आहे. जिल्ह्यातील केशरी व अंत्योदय योजनेतील १७ लाख ९६ हजार ५१ लाभार्थी मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. यातील कोण गरीब, कोण श्रीमंत? हे सांगणे कठीण आहे.
शासनाच्या नियमानुसार लाभार्थ्यांना मोफत रेशनचा लाभ देण्यात येत आहे. यामध्ये कोण गरीब आणि कोण श्रीमंत? हे सांगणे कठीण आहे. यापूर्वी अपात्र शिधापत्रिकाधारक काढण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. परंतु ही मोहीम काही दिवसांतच स्थगित झाली.
- गणेश बेल्लाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.