लोणार तालुक्यातील तांबोळा येथे १२ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:48 PM2018-01-01T19:48:55+5:302018-01-01T19:50:43+5:30
लोणार : तालुक्यातील तांबोळा येथील १२ वर्षीय बालाजी दिपक खरात याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : तालुक्यातील तांबोळा येथील १२ वर्षीय बालाजी दिपक खरात याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली.
लोणार तालुक्यातील तांबोळा येथील १२ वर्षीय बालाजी दिपक खरात हा ३१ डिसेंबर रोजी आई, वडिलांसोबत शेतात गेला होता. बालाजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी जातो म्हणून गेला. पंरतु लवकर परत न आल्याने त्याची शोधाशोध केली असता तो आढळून आला नाही. दरम्यान तांबोळा शिवारात असलेल्या विहिरीतील पाण्यावर चपला तरंगत असल्याचे दिसून आल्याने विहिरीत शोध घेतला असता बालाजी खरातचा मृतदेह सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आढळून आला. लोणार याप्रकरणी पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ.गजानन तायडे, प्रदिप सोनुने करीत आहेत.