१२ हजार शेतकऱ्यांनी पाेकरातून साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:22 AM2021-07-12T04:22:17+5:302021-07-12T04:22:17+5:30

बुलडाणा : शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ...

12,000 farmers make progress | १२ हजार शेतकऱ्यांनी पाेकरातून साधली प्रगती

१२ हजार शेतकऱ्यांनी पाेकरातून साधली प्रगती

Next

बुलडाणा : शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ४१३ गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये खारपाणपट्यातील १६६ गावांचा समावेश आहे. या याेजनेंतर्गत आतापर्यंत १२ हजार ८११ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. या अनुदानाच्या बळावर त्यांनी आपला आर्थिक विकास साधला आहे़ गत काही वर्षांपासून पावसाचे असमान वितरण, पावसातील माेठे खंड, मान्सूनचे उशिरा हाेणारे आगमन, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादी समस्यांना वारंवार ताेंड द्यावे लागते. या समस्यांमुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते. कृषी उत्पादनात माेठी घट हाेते. कृषी क्षेत्र मजबूत हाेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास हाेण्यासाठी राज्यात हवामान अनुकूल कृषी प्रकल्प (पाेकरा) जागतिक बॅंकेच्या मदतीने राबवण्यात येत आहे. याच प्रकल्पाचे नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४१३ गावांची निवड या प्रकल्पांतर्गंत करण्यात आली आहे. यामध्ये खारपाणपट्यातील १६६ गावांचा समावेश आहे. या याेजनेंतर्गत १ लाख ५७ हजार ९५० शेतकरी/ भूमिहीन शेतमजूर पात्र आहेत. तसेच ७१ हजार ९२७ जणांनी नाेंदणी केली आहे. प्रशासनाकडे प्राप्त अर्जांपैकी २८ हजार ३७८ अर्जांना पूर्व संमती दिली आहे. आतापर्यंत १२ हजार ८११ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले़

खारपाणपट्यातील गावांसाठी ठरले वरदान

जिल्ह्यातील खारपाणपट्यातील गावांमध्ये सिंचनाची कुठलीही साेय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर शेती करावी लागते़ पाेकरा याेजनेतून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत़े़ तसेच पिकांविषयी मार्गदर्शन करण्यात येत असल्याने खारपाणपट्यातील गावांसाठी ही याेजना वरदानच ठरत आहे़ अनेक शेतकऱ्यांनी पाेकरा याेजनेच्या मदतीने विक्रमी उत्पादन घेतले आहे़

पाेकरावर एक नजर

एकूण कार्यरत गावे ४१३

खारपाणपट्ट्यातील गावे १६६ पात्र

शेतकरी / भूमिहीन शेतमजूर संख्या १,५७,९५०

नोंदणी झालेले ७१ हजार ९२७

पूर्वसंमती दिलेले अर्ज २८, ३७८

अनुदान अदायगी १२,८११

Web Title: 12,000 farmers make progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.