तीन जिल्ह्यात १२१ घरकूले
By admin | Published: September 3, 2014 12:22 AM2014-09-03T00:22:54+5:302014-09-03T00:24:13+5:30
राजीव गांधी घरकूल योजनेमध्ये क वर्ग नगरपरिषदांचा समावेश; क वर्ग परिषदाना १२१ घरकूले मिळणार.
अमोल जायभाये / खामगाव
राजीव गांधी घरकूल योजनेमध्ये क वर्ग नगरपरिषदांचा समावेश केल्या नंतर राज्य शासनाने त्यामध्ये २0 कोटीचा निधी क वर्ग नगरपरिषदांसाठी राखीव ठेवला आहे. त्यामध्ये बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्यातील क वर्ग परिषदाना १२१ घरकूले मिळणार आहेत. राज्य शासनाने २२ ऑगस्ट रोजी राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेचे नामकरन करुन ही योजना राजीव गांधी घरकूल योजना असे करतानाच त्यामध्ये क वर्ग नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला होता. यामुळे तीन जिल्यात १२१ घरकूले मिळणार आहेत. या योजनेतील १ कोटी ७८ लाख ८ हजार ७५0 रु. तीन जिल्यांना मिळणार आहेत. इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आदिवासी घरकूल योजना या ग्रामीण भागात राबवण्यात येतात. मात्र शहरीभागातील नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही. नव्याने नागरीकरणामध्ये समावेश झालेला संपुर्ण भाग पुढारलेला या विकसीत नाही. यामुळे राज्य शासनाने या भागातील द्रारिद्रय रेषेखालील नागरिकांना या योजनेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर रोजगारासाठी स्थलांतर करुन क वर्ग नगरपरिषदामध्ये आलेल्या नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी राज्य शासनाने प्रत्येक घरकूला साठी क वर्गनगरपरिषदांना अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. या नविन वाढीनुसार प्रतिघरकूल १ लाख ३८ हजार ७५0 रु. असणार आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा ११ हजार २५0 असणार आहे.
*राजीव गांधी घरकूल योजने अंतर्गत सन २0१४-१५ मध्ये राज्यातील संपुर्ण क वर्ग नगर परिषदांमध्ये १४४१ घरकू ले बांधण्याचे उद्दीष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. या अंतर्गत यासाठी १९ कोटी ९९ लाख ३८ हजार ७५0 रु. निधी खर्च करण्यात येणार आहे.