मुलींच्या जन्मदराबाबत १२५ गावे संवेदनशील!

By admin | Published: September 22, 2016 01:29 AM2016-09-22T01:29:20+5:302016-09-22T01:29:20+5:30

बुलडाणा जिल्हय़ातील १२५ गावे मुलींच्या जन्मदराबाबत अत्यंत संवेदनशील.

125 villages sensitive to the birth of girls | मुलींच्या जन्मदराबाबत १२५ गावे संवेदनशील!

मुलींच्या जन्मदराबाबत १२५ गावे संवेदनशील!

Next

बुलडाणा, दि. २१- जिल्हय़ातील मुलींच्या घटत्या जन्मदराच्या चिंताजनक सामाजिक परिस्थितीच्या दृष्टीने ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण या उपक्रमांतर्गत सूक्ष्म विश्लेषण व नियोजन प्रक्रियेच्या माध्यमातून जिल्हय़ातील १२५ गावे मुलींच्या जन्मदराबाबत अत्यंत संवेदनशील असल्याचे निदर्शनास आले आहे. या गावांमध्ये जन्म घेणार्‍या मुलींच्या जन्माचे गुणोत्तर हे मुलांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, या संवेदनशील गावांमध्ये ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण अभियानाची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी सांगितले. जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या पुढाकारातून विविध उपक्रमांमधून सक्रिय सहभागातून प्रशासनाच्यावतीने ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण हे अभियान यशस्विरीत्या सुरु आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे व उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने सन २0१६ हे वर्ष ह्यवरीस लेकीचंह्ण म्हणून साजरे करण्याचे निश्‍चित केले आहे. मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या नियोजनात आरोग्य विभागाने केलेल्या विविध गावांच्या विश्लेषणात्मक अभ्यासात सुमारे १२५ गावे ही मुलींच्या जन्मदराबाबत अतिसंवेदनशील असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये बुलडाणा तालु क्यातील १७, चिखली ३९ गावांचा समावेश असून, देऊळगाव राजा (२२), सिं.राजा (२४), लोणार (0८) , नांदुरा (१५) अशा एकूण १२५ गावांचा समावेश आहे. यावर्षीे ऑगस्ट २0१६ पयर्ंत नांदुरा तालुक्यात मुलींचा जन्मदर हजारामागे ७२६ असून, संग्रामपूर व मोताळा तालुक्यात अनुक्रमे ८३६ व ८४३ असल्याचे निदर्शनास आले आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी खंत व्यक्त केली.

Web Title: 125 villages sensitive to the birth of girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.