१२६९ जणांची कोरोनावर मात, ६२० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:08+5:302021-04-30T04:44:08+5:30

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,८३४ जणांचे अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. त्यापैकी ...

1269 people beat Corona, 620 positive | १२६९ जणांची कोरोनावर मात, ६२० पॉझिटिव्ह

१२६९ जणांची कोरोनावर मात, ६२० पॉझिटिव्ह

Next

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,८३४ जणांचे अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. त्यापैकी ४,१३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील १७३, खामगाव तालुक्यातील ११८, शेगाव तालुक्यातील दोन, देऊळगाव राजा तालुक्यातील २२, चिखली तालुक्यातील ४०, मेहकर तालुक्यातील ४०, मलकापूर तालुक्यातील २२, नांदुरा ५७, लोणार तालुक्यातील ८०, मोताळ्यामधील १९, जळगाव जामोदमधील १५, सिंदखेडराजा मधील २७ आणि संग्रामपूर तालुक्यातील ५ जणांचा यात समावेश आहे. दुसरीकडे नांदुऱ्यातील दुर्गानगर मधील ६५ वर्षीय पुरुष, देऊळघाट येथील ४७ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील ५० वर्षीय महिला, सिंदखेड राजा येथील ६५ वर्षीय महिला, जाळीचा देव ता. भोकरदन येथील ५० वर्षीय महिला, सिंदखेड राजा येथील ६५ वर्षीय महिला, देऊळगाव राजा तालुक्यातील खैरव येथील ७० वर्षीय व्यक्ती, लोणार तालुक्यातील शिवणी पीसा येथील ४९ वर्षीय महिला व सैलानी येथीलही ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आतापर्यंत १,२५९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

--३,५२,११८ जणांचे अहवाल निगेटीव्ह--

आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३ लाख ५२ हजार ११८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ५५ हजार ५८० जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही ४,६९२ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ६२ हजार ६७१ झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ६८५ असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ६६८५ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ४०६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: 1269 people beat Corona, 620 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.