दुसरबीडचे १३ सदस्य सहलीसाठी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:36 AM2021-02-05T08:36:55+5:302021-02-05T08:36:55+5:30
दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील माेठ्या ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या दुसरबीड ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ...
दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील माेठ्या ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या दुसरबीड ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित पॅनलने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे. सरपंचपद हे नामाप्रसाठी राखीव झाले आहे. महिला आरक्षण निघण्यापूर्वीच १३ सदस्य सहलीसाठी रवाना झाले आहेत.
दुसरबीड ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये १७ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित पॅनलने जिंकून सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजप समर्थित पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. आता सरपंच निवडणुकीचे वेध सदस्यांना लागले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून २८ जानेवारी राेजी दुपारी राॅका समर्थित पॅनलचे १३ सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहे नवीन निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सत्ता लालचा देऊन विरोधकांना फूट पडता येऊ नये याची पूर्व खबरदारी म्हणून या सदस्यांना अज्ञातस्थळी पोहचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादीचेच होणार हे स्पष्ट आहे. तरीही राजकारणात वेळेवर काहीही हाेण्याची शक्यता असल्याने सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहे.