संग्रामपूर तालुक्यात एकात्मिक फलोत्पादनसाठी १३०० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:54 PM2018-08-26T12:54:25+5:302018-08-26T13:32:51+5:30

पातुर्डा : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत संग्रामपूर तालुक्यात १ जून २०१८ ते ३० जून २०१८ दरम्यान एक हजार ३१४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले.

 1300 applications for integrated horticulture in Sangrampur taluka | संग्रामपूर तालुक्यात एकात्मिक फलोत्पादनसाठी १३०० अर्ज

संग्रामपूर तालुक्यात एकात्मिक फलोत्पादनसाठी १३०० अर्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पातुर्डा : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत संग्रामपूर तालुक्यात १ जून २०१८ ते ३० जून २०१८ दरम्यान एक हजार ३१४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी ८५० शेतकºयांनी अर्जाची छायांकित प्रत कृषी विभागाच्या कार्यालयात जमा केली. उर्वरीत ४६४ शेतकºयांनी त्यांच्या अर्जाची छायांकित प्रत जमा केली नाही. त्या शेतकºयांना २७ आॅगस्ट पुर्वी कागदपत्रे व बाबींचा उल्लेख द्यावा लागणार आहे. ३० आॅगस्ट रोजी लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थ्यांची निवड होणार आहे. रोपवाटिीका, आळंबी उत्पादन, सामुहिक शेततळे, हरीतगृह, शेडनेट, प्लॉस्टीक मल्चिंग, २० अश्वशक्ती ट्रॅक्टर, हळद प्रक्रिया, कांदाचाळ, मधुनक्षिका वसाहत, पेरू लागवड आदी घटकांसाठी शासनाकडून अनुदान देण्यासाठी लाभार्थी निवड अशी ही योजना आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संग्रामपूर तालुक्यातील १३१४ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज करून या योजनेबद्दलचा उत्साह दाखवून दिला आहे. जून महिन्यात या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांनी त्यांच्या अर्जाची मुळ प्रत (हॉर्ड कॉपी) बाबींचा उल्लेख, शेतीची कागदपत्रे व केवायसी कृषी विभागाकडे देणे आवश्यक आहे. मात्र यापैकी आठशे पन्नास शेतकºयांनी संबंधित कागदपत्रे सादर केली उर्वरीत ४६४ शेतकºयांनी अद्याप आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली नाही. अशा शेतकºयांसाठी कृषी विभागाने २७ आॅगस्ट पूर्वी बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. ३० आॅगस्ट रोजी लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थी निवड करून त्या शेतकºयांना योजनेत सुचविलेल्या घटकांप्रमाणे अनुदान देवून संबंधित प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
२७ आॅगस्ट पुर्वी कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. ४६४ शेतकºयांनी अद्याप ही पुर्तता केली नाही. ३० आॅगस्ट रोजी लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. तत्पुर्वी ज्या शेतकºयांनी कागदपत्रे पूर्ण केले नाही त्यांनी ती पूर्तता करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title:  1300 applications for integrated horticulture in Sangrampur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.