बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३०० कोटींची कर्जमाफी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 02:45 PM2019-12-22T14:45:00+5:302019-12-22T14:45:10+5:30
एक लाख ९८ हजार १५९ शेतकºयांना लाभ होणार असून साधारणत: १३०० कोटी रुपयांच्या आसपास कर्जमाफी मिळण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक घडी विस्कळीत झालेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील एक लाख ९८ हजार १५९ शेतकºयांना लाभ होणार असून साधारणत: १३०० कोटी रुपयांच्या आसपास कर्जमाफी मिळण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात चार लाख ९१ हजार १५८ शेतकरी असून यापैकी ३१ मार्च २०१९ दरम्यान तीन लाख एक हजार १६७ शेतकरी हे किसान क्रेडीट कार्ड धारक शेतकरी होते तर याच तारखेअखेर जिल्ह्यातील एक लाख ९८ हजार १५९ शेतकरी हे थकबाकीदार होते. त्यापैकी एक लाख २४ हजार ५१९ शेतकºयांचे पीक कर्ज हे ओव्हरड्यू होते तर पूर्वीच्या शेतकरी कर्जमाफीमधील दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळून त्यावरील उर्वरित कर्ज हे ओटीएस अर्थात वनटाईम सेटलमेंटमध्ये न भरलेल्या शेतकºयांची संख्या २५ हजार ६४१ ऐवढी शेतकºयांची संख्या आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या मात्र त्याचा लाभ मिळू न शकलेल्या शेतकºयांची संख्या ही ४७ हजार ९९९ होती. या सर्व शेतकºयांनाही आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्यात जमा झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली दोन लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी ही ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या कर्जघेतलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ अखेर थकबाकीदार असलेल्या एक लाख ९८ हजार १५९ शेतकºयांच्या संख्येत आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा निश्चित आकडा समोर आला नाही. मात्र खरीपामध्ये असलेल्या एक हजार ७७३ कोटी ७७ लाख ४० हजार रुपयांच्या पीक कर्ज वाटपाच्या उदिष्टाच्या तुलेत ४१३.५७ कोटी रुपयांचे ५२ हजार ६१९ शेतकºयांना वाटप करण्यात आले होते. त्यामुळे आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत या शेतकºयांचाही समावेश या योजनेत असणार आहे. त्यामुळे वर्तमान उपलब्ध असलेल्या शेतकºयांच्या संख्येत आणखी वाढ होणार असल्याचे संकेत असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
जिल्हा केंद्रीय बँकेला वाचविण्यासाठी ज्या १६ हजार शेतकºयांनी ८३ कोटी रुपयांच्या कर्जाचा भरणा करून बँकेचा परवाना वाचविला होता. त्या शेतकºयांनाही या कर्जमाफीच्या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे. हे शतकरी नियमित कर्ज भरणा करणारे आहेत. दोन वर्षापासून त्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी बँक प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्या जात होते. त्यांच्यासाठी हा दिलासा म्हणावा लागेल..
- डॉ.अशोक खरात, सीईओ, बीडीसीसी