बुलडाणा  जिल्ह्यात सात महिन्यात सापडले १३९ एचआयव्ही रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 06:03 PM2018-11-30T18:03:52+5:302018-11-30T18:04:14+5:30

बुलडाणा: जिल्ह्यात एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण ०.३३ टक्केपासून आता ०.१७ टक्केपर्यंत म्हणजे जवळपास निम्म्याने कमी झाले आहे. गेल्या सात महिन्यात एड्सचे १३९ रुग्ण सापडले आहेत.

139 HIV patients found in Buldhana district in seven months | बुलडाणा  जिल्ह्यात सात महिन्यात सापडले १३९ एचआयव्ही रुग्ण

बुलडाणा  जिल्ह्यात सात महिन्यात सापडले १३९ एचआयव्ही रुग्ण

googlenewsNext

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण ०.३३ टक्केपासून आता ०.१७ टक्केपर्यंत म्हणजे जवळपास निम्म्याने कमी झाले आहे. गेल्या सात महिन्यात एड्सचे १३९ रुग्ण सापडले आहेत. यंदा जागतीक एड्स प्रतिबंधक दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात ‘नो युअर एचआयव्ही स्टेट्स’वर भर देण्यात येत असून यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाºया अधिकारी, कर्मचारी व लोकांची तपासणी मोहिम हाती घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. 
एड्सचा प्रादुर्भाव विविध कारणांमुळे होतो. हा रोग आता केवळ मोठ-मोठ्या शहरी भागातच राहिला नाही, तर सर्वत्र याचे लोन पसरले आहे. एड्स रोगावर प्रतिबंध मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष यंत्रणाही कार्य करते. रुग्णांचे समुपदेशन करण्यापासून त्यांच्या वेळोवेळी तपासण्या करणे, मोफत औषधी पुरविणे असे अनेक उपक्रम आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आले आहेत. देशात १ डिसेंबर हा जागतीक एड्स प्रतिबंधक दिन साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एचआयव्ही रुग्णांची स्थिती जाणून घेतली असता २०१४ पासून आजपर्यंत एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात २०१४ मध्ये ३३९ रुग्ण होते. त्यानंतर २०१५ मध्ये हे प्रमाण ०.२९ वर आले म्हणजे ३२५ रुग्ण सापडले होते. २०१६ मध्ये २५४ रुग्ण तर २०१७ मध्ये २८१ रुग्ण आढळून आले. या दरम्यान एड्स रुग्णांचे प्रमाण ०.१९ टक्के होते. तर एप्रिल पासून अजपर्यंत १३९ रुग्ण सापडले असून हे रुग्णांचे प्रमाण ०.१७ वर आले आहे. प्रत्येकाने स्वत: च एचआयव्ही तपासणी करून घ्यावी, यासाठी यावर्षी ‘नो युअर एचआयव्ही स्टेट्स’ असे घोषवाक्य तयार करून त्यानुशंगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºयांची तपासणी करुन घेण्यात येणार आहे. लवकरच या मोहिमेला सुरूवात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


सात लाख लोकांची तपासणी
जिल्ह्यात एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग स्थापन झाल्यापासून सात लाख लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली आहे. गेल्या नऊ वर्षात २१ टक्के लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असून त्यातील एड्स बाधीत रुग्णांना मोफत औषधी सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करण्यासाठी एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. 


१२ गरोदर महिला ‘पॉझिटिव्ह’
एप्रिल २०१८ पासून आजपर्यंत जिल्ह्यात ४६ हजार ७६५ लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३७ हजार १८२ गरोदर महिलांचा समावेश आहे. यामध्ये एचआयव्ही बाधीत एकूण १३९ रुग्ण सापडले असून त्यात १२ गरोदर महिलांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना मोफत औषधी सुरू करण्यात आली आहे. 


प्रत्येकाने एचआयव्ही तपासणी करून घ्यावी. त्यानुसार वेळीच औषध उपचार सुरू केल्यास एड्स प्रतिबंधक व नियंत्रण मिळविण्यास मदत होते. गरोदर महिलांनी तपासणी करणे गरजेचे असून होणाºया बालकांना यापासून सुरक्षीत ठेवल्या जाऊ शकते. त्यासाठी मोफत औषधीची व्यवस्था तातडीने करण्यात येत आहे. 
- प्रमोद टाले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, 
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, बुलडाणा. 

Web Title: 139 HIV patients found in Buldhana district in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.