हाणामारीप्रकरणी १४ दिवसांची कोठडी
By admin | Published: March 9, 2015 02:08 AM2015-03-09T02:08:37+5:302015-03-09T02:08:37+5:30
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील जुन्या वादातून हाणामारी प्रकरण.
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे जुन्या वादातून हाणामारीप्रकरणी अटक असलेल्या आरोपींना न्यायालयाने ८ मार्च रोजी १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. धामणगाव बढे येथे ५ मार्च रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शे. अफसर व शे. अख्तर यांना, आरो पींनी गैरकायद्याची मंडळी जमवून लोखंडी रॉडने मारहाण केली होती. याप्रकरणी शे. शफी शे. छोटू (रा. धा. बढे) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६ मार्च रोजी आठ जाणांना अटक केली. आसिफ खान राजोखान पठाण, असलम खान राजोखान पठाण, इम्रानखान न्याजोखान पठाण, अक्रमखान न्याजो खान पठाण, यासिनखान नूराखान, नावेदखान अकरमखान, सै. हमीद सै. अख्तर, इम्तियाजखान न्याजोखान, यासिनखान नूराखान यांचा साळा (रा. चांदवड) व इतर अनोळखी सात ते आठ जणांविरोधात कलम ३२५, ३२४, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५0४,५0६, आर. डब्ल्यू ३५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. धा. बढे पोलिसांनी शनिवार, ७ मार्च रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर के ले असता, आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर ८ मार्च रोजी धा. बढे पोलिसांनी उपरोक्त आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार सेवानंद वानखेडे करीत आहेत.