व्यापा-याकडून १४ तोळे चोरीचे सोने जप्त

By Admin | Published: August 28, 2016 11:32 PM2016-08-28T23:32:23+5:302016-08-28T23:32:23+5:30

जालना शहर पोलिसांची देऊळगावराजा येथे कारवाई.

14 gold coins stolen by traders from gold | व्यापा-याकडून १४ तोळे चोरीचे सोने जप्त

व्यापा-याकडून १४ तोळे चोरीचे सोने जप्त

googlenewsNext

देऊळगावराजा(जि. बुलडाणा),दि. २८: जालना शहर व परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षात अशोक सुरवशे याने अनेक ठिकाणी घरफोड्या करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केलेली आहे. जालना पोलीस दोन वर्षांंपासून त्याच्या शोधात होते. २५ ऑगस्ट रोजी त्यास पकडण्यात आले असता त्याने चोरी केलेले सोने सराफा लाइनमधील एका ज्वेलर्सचे मालक सुजित भाऊलाल साहुजी यांना विकल्याचे सांगितल्यावरून तपासी अधिकारी जे.एम. परदेसी यांनी त्यांच्या सहकार्‍यासह येऊन या व्या पार्‍याकडून १४ तोळे सोन्याची वसुली केली. या घटनेमुळे सराफा लाइनमध्ये एकच खळबळ उडाली.
जालना येथील कुख्यात चोर अशोक सुरवशे याने यापूर्वी जालना परिसरातील अनेक ठिकाणी घरफोड्या केलेल्या आहेत. त्याचा हा नेहमीचाच प्रकार आहे. गत दोन ते तीन वर्षांंंपासून पोलिसांना चकमा देऊन तो गायब होता.
शहरातील होत असलेल्या घरफोड्या रोखण्याकरिता पोलीस हतबल झाले होते. या चोराला पकडण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी पोलिसांनी कंबर कसली. शेवटी पोलिसांना यश झाले. चौकशीमध्ये त्याने ज्याच्या घरफोड्या केल्या त्याची कबुली देऊन चोरीतील अंदाजे ४00 ग्रॅम सोने शहरातील सराफा लाइनमधील एका ज्वेलर्सचे मालक सुजित भाऊलाल साहुजी यांना वेळोवेळी विकल्याचे सांगितले. त्यावरून या प्रकरणाचा तपास करणारे पो. उपनिरीक्षक जे.एम. परदेसी यांनी त्यांच्या सहकार्‍यांनी सोबत घेऊन त्या चोरट्यास शहरात आणले असता चोरट्याने सदर दुकान दाखविले. यावेळी ज्वेलर्सने काही सोने घेतल्याचे कबूल केले; मात्र चोरट्याने प्रत्येक वेळी बिना बट्याचे सोने आणून दागिने नेले व त्यानंतर तेच दागिने मला विकले असे सांगितले. यावरून तपास अधिकार्‍यांनी या प्रकरणात दुकान मालकास समजपत्र देऊन जालना सदर बाजार पोलीस स्टेशन तपास कामी उपस्थित राहण्याचे कळविले. दरम्यान, पोलिसांनी सदर व्यापार्‍याकडून १४ तोळे सोने ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे शहरातील सराफा लाइनमध्ये खळबळ उडाली होती तर अफवांचे पेवच फुटले होते.

Web Title: 14 gold coins stolen by traders from gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.