नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखाने फसवणूक

By admin | Published: September 14, 2016 12:52 AM2016-09-14T00:52:55+5:302016-09-14T00:52:55+5:30

बुलडाण्याच्या डॉक्टरने खामगावातील युवकाला गंडविल्याचा प्रकार समोर आला.

14 lakh fraud by showing bait for job | नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखाने फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखाने फसवणूक

Next

खामगाव(जि.बुलडाणा), दि. १३: नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित बुलडाणा येथील एका डॉक्टरने येथील समता कॉलनीतील युवकाला १४ लाख ७५ हजाराने गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील समता कॉलनी भागातील संदीप जानकीराम चव्हाण (वय ३२) या बेरोजगार युवकाला बुलडाणा येथील शिक्षक कॉलनीतील रहिवाशी डॉ.नरेंद्र हरिश्‍चंद्र वानखडे याने सहायक निबंधक पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून १४ ते १५ लाखाची मागणी केली. या आमिषाला बळी पडत संदीप याने १९ जानेवारी २0१२ रोजी डॉ.वानखडे याला १४ लाख ७५ हजार रुपये दिले; मात्र त्यानंतर त्याने नोकरी लावून देण्यास नकार दिला. त्यामुळे संदीप याने त्याच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली; मात्र तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे संदीप चव्हाण याने काल १२ सप्टेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी डॉ.वानखडे यांच्याविरुद्ध अप.नं. ३0९/१६ कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 14 lakh fraud by showing bait for job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.