बस अपघातात १४ प्रवाशी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:31 AM2021-01-22T04:31:57+5:302021-01-22T04:31:57+5:30

साखरखेर्डा ते दुसरबीड रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाचविताना एस. टी. बस ...

14 passengers injured in bus accident | बस अपघातात १४ प्रवाशी जखमी

बस अपघातात १४ प्रवाशी जखमी

googlenewsNext

साखरखेर्डा ते दुसरबीड रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाचविताना एस. टी. बस पलटी झाली. लोणार येथून खामगावसाठी सकाळी सहा वाजता एस. टी. बस (क्रमांक एम-एच-४०-८६७८) निघाली होती. बिबी येथून मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा, लव्हाळा मार्ग जात असताना मलकापूर पांग्रा जवळील स्व. विजय मखमले विद्यालयाजवळ या बसचा अपघात झाला. या बस मध्ये सुमेध प्रमोद शेजूळ, भिमा रवींद्र मुतळकर, रवींद्र मुतळकर, लता भाऊराव सरकटे, एकनाथ महादेव मुळे, कांताबाई बबन घाईत, शेख अमिन शेख अख्तर (सर्व रा . बिबी आणि मलकापूर पांग्रा) हे प्रवास करीत होते. मलकापूर पांग्रा येथील मखमले विद्यालयाजवळ बस येताच रोडवरील खड्डे वाचविताना एस. टी. बस पलटी झाली. त्या बसमध्ये प्रवास करणारे सहाही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात होताहोता टळला. सहाही प्रवाशांना मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. चाटे यांनी प्राथमिक उपचार केले.

साखरखेर्डा ते दुसरबीड रस्त्यांची दूरवस्था

समृध्दी महामार्गावरील वाहनांनी या परिसरातील रस्त्यांची चाळणी केली आहे. देऊळगाव कोळ येथील ई- क्लास जमीन खोदुन त्यातील मुरुम हा समृध्दी महामार्गासाठी वापरल्या जात आहे. देऊळगाव कोळ ते समृध्दी महामार्गापर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या रोडवरुन मुरुमाची वाहतूक सुरु आहे. या जड वाहनामूळे देऊळगाव कोळ ते झोटींगा फाटा आणि झोटींगा फाटा ते दुसरबीड या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रत्येक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडले असून दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. या अगोदर सुध्दा अनेक अपघात या खड्ड्यांमुळे झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि समृध्दी महामार्गावरील ठेकेदारांनी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण मखमले, पांडुरंग कापसे यांनी केली आहे.

Web Title: 14 passengers injured in bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.