बुलडाणा तालुक्यात १४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:04+5:302021-06-16T04:46:04+5:30
झाडे लावायची तरी कोठे? मेहकर: वृक्षलागवड उपक्रमांतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायतींना उद्दिष्ट देण्यात येते. मात्र, यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले असल्याने ...
झाडे लावायची तरी कोठे?
मेहकर: वृक्षलागवड उपक्रमांतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायतींना उद्दिष्ट देण्यात येते. मात्र, यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले असल्याने आता अनेक ग्रामपंचायतींकडे जागाच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
खरीप हंगाम अडचणीत
लोणार : निसर्गाचा लहरीपणा, पावसाचे अत्यल्प प्रमाण, शासनाकडून मिळणारी तुटपुंजी मदत व लागवडीचा खर्च यांचा मेळ बसत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अडचणीत सापडला आहे. पेरणीकरिता पैसे नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
कमी, अधिक दाबाने वीजपुरवठा
डोणगाव: परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा नियमित खंडित होत आहे. कमी जास्त दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरातील लाईट, फॅन, फ्रीज ही उपकरणे निकामी होत आहेत. ग्रामीण भागातील अनेक खांबावरील तारा लोंबकळलेल्या आहेत.
गौण खनिज वाहतूक करणारे टिप्पर सुसाट
सुलतानपूर: गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे टिप्पर सुसाट सुटलेले दिसून येत आहेत. मराठवाड्यातून येणारी रेती वाहतुकीची वाहने सुलतानपूर मार्गेच जातात. यातील अनेक वाहने अवैधपणे रेतीची वाहतूक करीत असल्याचे दिसून येते.
पोषण आहाराची चौकशी करा
मेहकर: तालुक्यात काही अंगणवाडीमध्ये नियमित धान्य वाटप होत नसल्याचे चित्र आहे. अंगणवाडी बंद असल्याने व विद्यार्थीच उपस्थित राहत नसल्यामुळे शासनाकडून प्राप्त होणारा पोषण आहार नियमित वाटप होतो की नाही, याची चौकशी करणे आवश्यक आहे.
बोअरवेलची खोली गेली ७०० फुटापर्यंत
बुलडाणा: तालुक्यात बोअरवेलची खोली ४०० ते ७०० फुटांपर्यंत पोहोचली आहे. शासनाच्या नियमानुसार २०० फूट खोल बोअरवेल खोदण्यास परवानगी आहे. मात्र नियमाकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नालीतील सांडपाणी साचले रस्त्यावर
बुलडाणा : परिसरातील काही भागात नालीत कचरा साचल्याने सांडपाणी मुख्य रस्त्यावर येत आहे. सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वाहनधारकांना याचा चांगलकच त्रास सहन करावा लागला.