१४४ शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:59 AM2017-07-27T01:59:29+5:302017-07-27T02:00:36+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणात १४४ मुले आढळून आली आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना वयानुसार नजिकच्या शाळांमध्ये दाखल करून घेण्यात आले असून, एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहीम नुकतीच राबविण्यात आली. यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात ३३, शेगाव तालुक्यात ४० व संग्रामपूर तालुक्यात ४९ असे एकूण १४४ शाळाबाह्य मुले आढळून आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या १४४ शाळाबाह्य मुलांमध्ये ८४ मुले तर ६८ मुलींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आढळून आलेल्या १४४ शाळाबाह्य मुलांना नजिकच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यात प्राथमिक गटात ६६ व उच्च प्राथमिक ग्टात ८६ मुलांना प्रवेश देण्यात आला आहे.
या मुलांना विशेष प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याच बरोबर मुलांना पाठ्यपुस्तक, गणवेष, शालेय पोषण आहार देण्यात येत आहे. त्याच बरोबर या मुलांच्या समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे.