आयटीआयला १,४४२ प्रवेश; सर्वाधिक पसंती इलेक्ट्रिशियनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:25 AM2020-12-27T04:25:46+5:302020-12-27T04:25:46+5:30
बुलडाणा : गत काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढत आहे. पदवीपयर्यंत शिक्षण घेऊनही नाेकरीची हमी नसल्याने युवक व्यावसायिक शिक्षणाकडे ...
बुलडाणा : गत काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढत आहे. पदवीपयर्यंत शिक्षण घेऊनही नाेकरीची हमी नसल्याने युवक व्यावसायिक शिक्षणाकडे वळले आहेत. काेराेनामुळे यावर्षी आयटीआय प्रवेशास विलंब झाला. आतापर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्या झाल्या असून, १ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची सर्वाधिक पंसती इलेक्ट्रिशियन ट्रेडला असल्याचे चित्र आहे.
काेराेना संसर्ग वाढल्याने शाळा, महाविद्यालय बंदच आहेत. शासनाने नववी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. इतर वर्गांविषयी अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. दहावीनंतर विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढला आहे. महावितरणकडून माेठ्या प्रमाणात पदभरती हाेत असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा इलेक्ट्रिशियन ट्रेडकडे वाढला आहे.
जिल्ह्यात १३ आयटीआय महाविद्यालये असून, २,८४२ प्रवेशक्षमता आहे. चार फेऱ्यांनंतर १,४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. १,४०० जागा रिक्त आहेत. या जागांसाठी आता २९ आणि ३० डिसेंबर राेजी जिल्हास्तरीय प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने आयटीआयमध्ये काेराेनाविषयक नियमांचे पालन करणे सहज शक्य दरवर्षांपासून विद्यार्थ्यांचा असल्याचे शासकीय आयटीआय बुलडाण्याचे प्राचार्य प्रकाश खुळे यांनी सांगितले. तसेच वर्ग निर्जंतुकीकरण व इतर उपाय याेजनाही करण्यात आल्याचे खुळे यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.
१ जानेवारीपासून वर्ग सुरू हाेणार
कोरोनाविषयक नियमांचे पालन करून येत्या १ जानेवारीपासून आयटीआयचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इतर महाविद्यालयांच्या तुलनेत आयटीआयमध्ये विद्यार्थी संख्या कमी असते. त्यामुळे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे साेपे असते. तसेच इतर नियमांचे पालन करून वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, असे प्राचार्य प्रकाश खुळे यांनी सांगितले.
या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा कल
गत काही गत काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिशियन ट्रेडकडे कल आहे. त्यानंतर फिटर, वायरमन, मशीनिस्ट आणि माेटर मेकॅनिक आदी ट्रेडमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा असते. आयटीआयचे दर वर्षी १०० टक्के प्रवेश हाेत असल्याचे चित्र आहे.