१४८ जणांची काेरेानावर मात, ३५ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:57+5:302021-06-16T04:45:57+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून मंगळवारी केवळ ३५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच १४८ ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून मंगळवारी केवळ ३५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच १४८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून, ३०६५ कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत़
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ७, बुलडाणा तालुका पळसखेड भट १, शिरपूर १, संग्रामपूर तालुका कुंभारखेड १, चिखली शहर २, चिखली तालुका पिंपळगाव १, सवणा १, तेल्हारा २, शेलगाव जहागीर २, अंत्री खेडेकर १, मंगरूळ नवघरे २, एकलारा १, करवंड १, मेहकर तालुका सोनाटी १, जळगाव जामोद शहर ७, जळगाव जामोद तालुका आसलगाव १, लोणार तालुका बिबी २, पिंप्री खंडारे १ आदींचा समावेश आहे़ तसेच जानेफळ, ता. मेहकर येथील ३९ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत ५ लाख ३४ हजार ६९५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
१४३ बाधितांवर उपचार सुरू
आज रोजी १०९३ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८६ हजार ४३ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८५ हजार २५० कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात १४३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६५० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.