पावसाळ्यातही १५ गावात तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:14 AM2017-09-11T01:14:14+5:302017-09-11T01:14:44+5:30
यावर्षी अत्यल्प झालेला पाऊस, विविध प्रकल्पात असलेला अल्प जलसाठा, दिवसागणिक भूगर्भातील खोल जात असलेली पाणी पातळी यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यां तील १५ गावांमध्ये पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्या त येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: यावर्षी अत्यल्प झालेला पाऊस, विविध प्रकल्पात असलेला अल्प जलसाठा, दिवसागणिक भूगर्भातील खोल जात असलेली पाणी पातळी यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यां तील १५ गावांमध्ये पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्या त येत आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी पावसाचे अत्यल्प असल्यामुळे अर्धेअधिक प्रकल्प तहानलेले होते; परंतु नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम लघू प्रकल्पात बर्यापैकी जलसाठा उपलब्ध झाला होता. अनेक शेतकर्यांनी या प्रकल्पातील पाण्याचा सिंचनासाठी वापर केला होता. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात हे प्रकल्प अध्र्यावर आले होते. दाहकत्या उन्हामुळे झालेले पाण्याचे बाष्पीभवन, सिंचनासाठी पाण्याचा भरमसाट वापर या कारणामुळे जिल्ह्यातील ५५ लघू प्रकल्प कोरडेठाक पडले तर अद्यापही तोरणा, मन हे दोन मध्यम प्रकल्प शेवटच्या घटका मोजत आहेत.
पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे; परंतु अद्यापही जिल्ह्यातील एकाही नदी- नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे आजही जिल्ह्यातील मोठय़ा, मध्यम लघू प्रकल्पाची स्थिती चिंताजनक आहे. तीन महिन्यात जो काही पाऊस पडला तो फक्त पिकासाठीच पोषक ठरला आहे. सध्या स्थितीत प्रकल्पात पाणीसाठा उ पलब्ध नसल्यामुळे अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याचे दिवस अस ताना जिल्ह्यातील १५ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावातील नागरिकांची पाण्यासाठी हेळसांड होऊ नये, यासाठी या गावांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून प्रशासनाने विंधन विहिरी, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, टँकरने पाणी पुरवठा खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. येत्या काही दिवसात पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यास पाणीटंचाईग्रस्त गावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असलेली गावे
बुलडाणा तालुक्यातील गोंधनखेड, पिंपरखेड या गावाला प्र त्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक एक टँकर, देऊळगावराजा तालु क्यातील पाडळी शिंदे, नागणगाव, धोत्रा नंदई प्रत्येकी एक टँकर, मेहकर तालुक्यतील दुर्गबोरी, पारडी, बोथा, वरवंड घुटी या गावासाठी प्रत्येकी एक टँकर, सिंदखेड राजा तालु क्यातील सोनोशी, सावरगाव, माळ, सुजलगाव प्रत्येकी एक टँकर खामगाव तालुक्यातील जळका तेली या गावासाठी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.