पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कार्यक्रातंर्गत बुलडाणा जिल्ह्यात १५ डायलिसीस मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 05:53 PM2018-09-18T17:53:47+5:302018-09-18T17:54:45+5:30
बुलडाणा : किडणीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार्या पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कार्यक्रातंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात येत असलेल्या जळगाव जामोद व वरवंड बकाल डायलेसीसचे दोन युनीट उघडण्यात येणार आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा : किडणीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार्या पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कार्यक्रातंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात येत असलेल्या जळगाव जामोद व वरवंड बकाल डायलेसीसचे दोन युनीट उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयाला २७ आॅगस्ट रोजीच केंद्राच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने एक पत्र प्राप्त झाले आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात डायलेसीससाठी १५ मशीन उपलब्ध असून जिल्ह्यातील पाच तालुक्यात पसरलेल्या खारपाणपट्यातील किडणी आजारग्रस्तांना या डायलेसीस कार्यक्रमाचा मोठा लाभ होणार आहे. देशपातळीवर यापूर्वीच पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यातंर्गत शहरी आणि सब डिव्हीजनस्तरावर आता किडणी डिसीससाठी हा प्रोगाम राबविण्यात येत आहे. त्यातंर्गत ही युनीट प्रस्तावीत करण्यात आलेली आहेत. दुसरीकडे राज्यातील ३६ जिल्ह्यापैकी २४ जिल्ह्यामद्ये पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कार्यक्रम सुरू करण्यात आला असून आणखी १२ जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करणे गरजेचे असल्याचे केंद्राच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ‘पैसेवाल्यांचे उपचार’ म्हणून याकडे बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, खामगाव या पाच तालुक्यात तथा मलकापूर तालुक्यालगतच्या काही भागात खारपाणपट्याची समस्या आहे. यामध्ये जवळपास १४० पेक्षा अधिक गावे ही खारपाणपट्यात येतात. त्यामुळे या भागातील अनेक नागरिक किडणीच्या आजारांनी ग्रस्त आहेत. अनेकांचा त्यामुळे मृत्यूही झाला आहे. या पृष्ठभूमीवर पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कार्यक्रम महत्त्वपूर्ण असून किडणी डिसीससाठीच तो प्रामुख्याने वाहलेला राहणार आहे. दहा हजार व्यक्तींना डायलेसीसचा लाभ जिल्हा सामान्य रुग्णालयात २००९ पासून डायलेसीस युनीट कार्यान्वीत असून येथे सहा पैकी पाच मशीनवर आतापर्यंत दहा हजार व्यक्तींना डायलेसीसचा लाभ झाला आहे. दरम्यान, एक मशीन बंद आहे. प्रारंभी एनआरएचएम नंतर जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत हे डायलेसीस करण्यात आले असून ते अगदी रुग्णाच्या केसपेपर पासून मोफत आहे. आता पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कार्यक्रमातंर्गत याची व्याप्ती वाढणार असून जिल्ह्यात वाढत्या किडणीग्रस्त रुग्णांची संख्या पाहता हा प्रोग्राम उपयुक्त ठरणारा आहे. सध्या बुलडाणा, खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणि शेगाव येथे १५ मशीन डायलेसीस युनीटतंर्गत कार्यरत आहेत. नव्याने प्रस्तावीत युनीटमुळे त्यात आणखी भर पडेल.
जळगाव जामोद व वरवंड बकालला आठ मशीन
जळगाव जामोद आणि वरवंड बकाल येथे डायलीसीस युनीट कार्यान्वीत होत असून येथे प्रत्येकी चार डायलेसीस मशीन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या आदीवासी भागातील नागरिकांनी या महागड्या उपचारासाठी शेगाव, बुलडाणा तथा खामगाव येथे येण्याची गरज पडणार नाही. स्थानिक पातळीवरच त्यांना डायलेसीसची सुविधा उपलब्ध होईल.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला हव्यात तीन मशीन
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या डायलेसीसच्या पाच मशीन कार्यरत असल्या तरी डायलेसीस करणार्यांची १८६ पर्यंत वाढलेली प्रतीक्षा यादी व दिवसेंदिवस डायलेसीसची गरज असलेल्या रुग्णांची वाढती संख्या पाहत येथे आणखी तीन मशीनची गरज आहे. खासगी रुग्णालयात डायलेसीस करण्याचा खर्च चार हजार रुपये खर्च एका वेळेसाठी येतो. मात्र या उपक्रमातंर्गत रुग्णांना मोफत ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे सामान्य कुटूंबातील व्यक्तींसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. एका रुग्णाच्या डायलेसीससाठी किमान चार तासांचा लागणारा कालावधी पाहता जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील या युनीटवर मोठा ताण पडलेला आहे. त्यामुळे बुलडाणा येथे मशीनची संख्या वाढविण्याची गरज आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस प्रोग्राम आधीच जाहीर करण्यात आलेला आहे. त्यातंर्गत सब अर्बन एरियात डायलेसीस युनीट उघडण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि वरवंड बकाल येथे येत्या काळात युनीट उघडण्यात येणार असून त्यात प्रत्येकी चार डायलेसीस मशीन उपलब्ध राहतील.
- पी. बी. पंडीत, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा