बुलडाणा जिल्ह्यात आणखी १५ पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या पोहोचली १९८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 10:48 AM2020-06-28T10:48:51+5:302020-06-28T10:49:04+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता १९८ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात शनिवारी तब्बल १५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या असून यात मलकापूरमधळी पाच, धामणगाव बढेमधील सहा तर नांदुऱ्यामधील दोन व्यक्तींचा समावेश आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव आणि खामगावमधील दाल फैल भागातील प्रत्येकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता १९८ झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १८३ कोरोना बाधीत होते. त्यात १५ ने आता वाढ झाली आहे. अकोला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ६५ अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यात ५० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर १५ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील एका १२ वर्षीय मुलीसह सहा महिलांचा समावेश आहे. मलकापूर शहरातील आणखी पाच जण पॉझिटिव्ह आले असून यात मोहनपुरा भागातील एक महिला, १७, ३७, ३५ वर्षाच्या व्यक्तींचा समावेश आहे. सोबतच एक ४५ वर्षीय व्यक्ती पॉझिटव्ह आला आहे. मुळचा डोणगाव येथील असलेला एक व्यक्ती परदेशातून आल्यानंतर मेहकरमधील हॉटेलमध्ये क्वारंटीन होता तो ही पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे नांदुºयातील घासलेट पुरा भागातील सहा वर्षीय मुलगा, ४३ वर्षीय एक व्यक्ती आणि खामगावमधील दालफैल भागातील एक ७५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे मलकापूरमधील एका पॉझिटिव्ह रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. चाळीस बिघा परिसरातील हा व्यक्ती होता. २,४१८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले.१०१ रुग्णांचे अहवाल अद्याप बाकी आहेत. तर ४८ रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहे.
धामणगाव बढेमध्ये कोरोना बाधीतांची संख्या १२
धामणगाव बढे: शनिवारी प्राप्त कोरोना पॉझिटिव्ह अहवालामध्ये धामणगाव बढे येथील सहा महिला पॉझिटिव्ह आल्यामुळे येथील एकूण कोरोना बाधीतांची संख्या १२ झाली आहे. यामध्ये १९ जून रोजी मृत्यू पावलेल्या युवकाचाही समावेश आहे. येथे आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या सर्वच व्यक्ती या मृत व्यक्तीच्या निकवर्तीयांपैकी आहेत.मृत व्यक्तीच्या निकट संपर्कातील ८३ व्यक्तींना आतापर्यंत बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, गावातील एकंदर स्थिती प्रसंगी गंभीर बनण्याची स्थिती पाहता गावाच्या सीमा बंद करण्याची गरज आहे.