१५ मैदानात, १0 उमेदवारांची माघार
By admin | Published: October 2, 2014 12:16 AM2014-10-02T00:16:22+5:302014-10-02T00:16:22+5:30
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात १५ उमेदवार उभे.
बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात १५ उमेदवार उभे ठाकले आहेत. मात्र खरी लढत शिवसेना, काँग्रेस व भाजपामध्येच होत असून मनसेमुळे होणारे मतविभाजन या निवडणुकीतील रंगत वाढविणार आहे. आज भाजपामधील बंडखोरी टळली मात्र शिवसेनेचे मुन्ना बेंडवाल यांनी अर्ज कायम ठेवत सेनेवर निशाणा रोखला आहे. आता रिंगणात नरेश शेळके राष्ट्रवादी, योगेंद्र गोडे भाज पा, विजयराज शिंदे शिवसेना, संयज गायकवाड मनसे, हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस, शंकर चौधरी बसपा, अझहर सिकंदर खान भारिप, कृष्णकांत बगाडे रिपाई तर अपक्ष म्हणून गजानन झगरे, गणेश इंगळे, नामदेव डोंगरदिवे, पंढरी तायडे, प्रशांत वाघोदे, मुन्ना बेंडवाल, अ.मुस्ताक अ.वहाब यांचा समोवश आहे. तर अर्ज मागे घेणार्यामध्ये अशोक शिंदे, एकनाथ खर्चे, दादाराव गायकवाड, मिलींद दाभाडे, प्रमोद कळसकर, विष्णु पाटील, रामकृष्ण झांबरे, डॉ.रामप्रसाद भोंडे, विजेंद्र साबळे, विष्णु पंत पाटील यांचा समावेश आहे.